IPL 2025 : मुंबईचा हुकमी एक्का, हार्दिकने विश्वास दाखवला, एका बॉलने सामना फिरवला, गुजरातचा गेम ओव्हर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला स्पर्धेच्या बाहेर केलं आहे. मुंबईने दिलेल्या 229 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 208 रन करता आल्या.
मुंबई : आयपीएल 2025 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला स्पर्धेच्या बाहेर केलं आहे. मुंबईने दिलेल्या 229 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 208 रन करता आल्या. गुजरातविरुद्धच्या या विजयासोबतच मुंबई आता क्वालिफायर-2 खेळणार आहे. रविवार 1 जूनला मुंबई पंजाबविरुद्ध प्ले-ऑफचा सामना खेळेल. या सामन्यात विजय मिळवलेली टीम आरसीबीविरुद्ध फायनलमध्ये खेळेल.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात खराब झाली. इनिंगच्या पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलला गुजरातचा कर्णधार शुबमन गिल आऊट झाला. ट्रेन्ट बोल्टने गिलला एलबीडब्ल्यू केलं, यानंतर कुसाल मेंडिस हिट विकेट आऊट झाला, पण त्यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदरने मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. साई सुदर्शनने 49 बॉलमध्ये 80 आणि वॉशिंग्टन सुंदरने 24 बॉलमध्ये 48 रनची खेळी केली.
advertisement
एका बॉलने फिरली मॅच
वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन गुजरातला जिंकवून देणार असं वाटत असतानाच मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला, त्यानंतर बुमराहने यॉर्कर बॉलवर सुंदरला बोल्ड केलं आणि मुंबईने सामन्यात कमबॅक केलं. यानंतर 2 ओव्हरनी साई सुदर्शनही बोल्ड झाला. मुंबईकडून आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या ग्लिसनने साई सुदर्शनला बोल्ड केलं.
advertisement
मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टला 2 विकेट मिळाल्या तर जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिचेल सॅन्टनर आणि अश्वनी कुमार यांना 1-1 विकेट मिळाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2025 11:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : मुंबईचा हुकमी एक्का, हार्दिकने विश्वास दाखवला, एका बॉलने सामना फिरवला, गुजरातचा गेम ओव्हर!