IPL 2025 : 5 सिक्सचा हिरो; गरज असताना झिरो, 4 कोटींचा स्टार तोंडावर आपटला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरातला धक्का दिला आहे. मुंबईने दिलेल्या 229 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 208 रन करता आले.
मुंबई : आयपीएल 2025 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरातला धक्का दिला आहे. मुंबईने दिलेल्या 229 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 208 रन करता आले. या पराभवासोबतच गुजरातचं आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे, तर मुंबई आता क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार आहे, या सामन्यातील विजयी टीम आरसीबीविरुद्ध फायनलमध्ये खेळेल.
मुंबईने दिलेल्या एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन शुबमन गिलच्या रुपात धक्का लागला. 2 बॉलमध्ये एक रन करून गिल आऊट झाला, त्यानंतर कुसल मेंडिसही 20 रनवर माघारी गेला. पण साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. साई सुदर्शनने 49 बॉलमध्ये 80 आणि वॉशिंग्टन सुंदरने 24 बॉलमध्ये 48 रन केले.
advertisement
जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने सुदर्शन आणि सुंदरची पार्टनरशीप तुटली, जेव्हा वॉशिंग्टन सुंदर बोल्ड झाला. सुंदर आऊट झाल्यानंतर शर्फेन रदरफोर्डनेही 24 रनची आक्रमक खेळी केली, पण रदरफोर्ड आऊट झाल्यानंतर राहुल तेवतिया बॅटिंगला आला. यश दयाळला 5 सिक्स मारल्यानंतर राहुल तेवातिया प्रकाशझोतात आला होता, त्यामुळे यंदाच्या लिलावात गुजरातने तेवातियाला तब्बल 4 कोटी रुपये दिले, पण तेवतियाला त्याची जुनी जादू दाखवता आली नाही.
advertisement
राहुल तेवातियाने 11 बॉलमध्ये 16 रन केले, तर शाहरुख खानने 7 बॉलमध्ये 13 रनची खेळी केली. शाहरुख खानलाही गुजरातकडून खेळताना त्याची चमक दाखवता आली नाही. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर बुमराह, ग्लिसन आणि अश्वनी कुमारला 1-1 विकेट मिळाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 12:04 AM IST