Shubman Gill : आधी हात मिळवला नाही, आता हार्दिकला म्हणतो... 24 तासानंतर गिलची पहिली रिएक्शन

Last Updated:

आयपीएल 2025 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत झाला, या सामन्याच्या टॉसवेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि गुजरातचा कर्णधार शुबमन गिल समोरासमोर आले.

आधी हात मिळवला नाही, आता हार्दिकला म्हणतो... 24 तासानंतर गिलची पहिली रिएक्शन
आधी हात मिळवला नाही, आता हार्दिकला म्हणतो... 24 तासानंतर गिलची पहिली रिएक्शन
मुंबई : आयपीएल 2025 च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत झाला, या सामन्याच्या टॉसवेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि गुजरातचा कर्णधार शुबमन गिल समोरासमोर आले, पण टॉसनंतरचा या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दोघंही एकमेकांना हात मिळवत नसल्याचं समोर आलं, त्यानंतर मॅचमध्ये गिलची विकेट गेल्यानंतर हार्दिक पांड्याने आक्रमक सेलिब्रेशन केलं. या सगळ्या प्रकारानंतर शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता शुबमन गिल यानेच या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

शुबमन गिलची इन्स्टा पोस्ट

शुबमन गिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. पांड्यासोबतची मैत्री घनिष्ठ असल्याचं त्याने या पोस्टमध्ये सांगितलं आहे, तसंच इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही गिलने चाहत्यांना केलं आहे. सोबतच गिलने हार्दिकसोबतचे दोन फोटो टाकले आहेत. 'प्रेमाशिवाय दुसरे काहीही नाही, इंटरनेटवर जे काही दिसते त्यावर विश्वास ठेवू नका', असं कॅप्शन गिलने या फोटोंना दिलं आहे.
advertisement

मुंबई क्वालिफायर-2 मध्ये

गुजरातचा पराभव करून मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचली आहे. आता त्यांचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जशी होईल. एलिमिनेटरच्या रोमांचक सामन्यात मुंबईने गुजरातचा 20 रननी पराभव केला. रोहित शर्माने 81 रन केल्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने 228 रनचा मोठा स्कोअर उभा केला. गुजरातच्या बॅटरना हे लक्ष्य गाठता आले नाही.
advertisement
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आल्यानंतर शुबमन गिल लवकर बाद झाला, पण साई सुदर्शनने किल्ला लढवला पण तोही शेवटी आऊट झाला. वॉशिंग्टन सुंदरने बॅटिंगमध्ये चांगले योगदान दिले तो अर्धशतकाच्या जवळ होता, पण मोकाच्या क्षणी हार्दिकने बुमराहच्या हातात बॉल दिला आणि त्याने सुंदरला बोल्ड केलं.

आरसीबी फायनलमध्ये

आता, दुसऱ्या क्वालिफायरमधील विजेत्या टीमचा सामना आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये आरसीबीशी होईल. जर मुंबईने या हंगामात विजय मिळवला तर ते सहाव्यांदा ट्रॉफी जिंकतील. यावेळीही मुंबई इंडियन्सची टीम खूपच मजबूत दिसत आहे. त्यांच्याकडे रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी खेळाडू आहेत. तसंच टीममधील तरुण खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : आधी हात मिळवला नाही, आता हार्दिकला म्हणतो... 24 तासानंतर गिलची पहिली रिएक्शन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement