IPL ची ट्रॉफी कोण उचलणार? 14 वर्षांच्या रेकॉर्डमुळे आधीच ठरला चॅम्पियन!

Last Updated:

आयपीएल 2025 च्या प्ले-ऑफ सामन्यांना सुरूवात झाली आहे. गुरूवारी झालेल्या क्वालिफायर-1 च्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करून थेट फायनलमध्ये मजल मारली आहे.

IPL ची ट्रॉफी कोण उचलणार? 14 वर्षांच्या रेकॉर्डमुळे आधीच ठरला चॅम्पियन!
IPL ची ट्रॉफी कोण उचलणार? 14 वर्षांच्या रेकॉर्डमुळे आधीच ठरला चॅम्पियन!
मुंबई : आयपीएल 2025 च्या प्ले-ऑफ सामन्यांना सुरूवात झाली आहे. गुरूवारी झालेल्या क्वालिफायर-1 च्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करून थेट फायनलमध्ये मजल मारली आहे. क्वालिफायर-1 मध्ये पंजाबचा पराभव झाला असला तरीही त्यांना फायनलला पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. आयपीएलमध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे, या सामन्यात विजय मिळवलेली टीम पंजाबविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळेल आणि विजेती टीम फायनलमध्ये प्रवेश करेल, पण मुंबई-गुजरात यांच्यातल्या पराभूत टीमचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल.

क्वालिफायर-1 जिंकणारी टीम चॅम्पियन

आयपीएलमध्ये प्ले-ऑफचा फॉरमॅट 2011 साली सुरू झाला, त्याआधी दोन सेमी फायनल आणि फायनल खेळवली जायची. या मोसमाच्या आधी 14 वेळा प्ले-ऑफ फॉरमॅटमध्ये खेळवला गेला आहे. यातल्या मागच्या 11 मोसमांपैकी फक्त 2 वेळाच क्वालिफायरमध्ये पराभूत झालेली टीम आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर 9 वेळा क्वालिफायर-1 जिंकणारी टीम आयपीएल चॅम्पियन ठरली आहे. 2013 आणि 2017 साली मुंबई इंडियन्सचा क्वालिफायर-1 च्या सामन्यात पराभव झाला होता, तरीही त्यांनी ट्रॉफी जिंकली. तर 2016 साली सनरायजर्स हैदराबादने एलिमिनेटर, क्वालिफायर-2 आणि फायनलही जिंकली होती, असा विक्रम करणारी हैदराबाद आयपीएल इतिहासातील एकमेव टीम आहे.
advertisement

क्वालिफायर हरूनही फायनल गाठली

आयपीएल इतिहासामध्ये आतापर्यंत 11 वेळा क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झालेल्या टीमने फायनल गाठली आहे, म्हणजेच या टीमनी क्वालिफायर-2 जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमातही सनरायजर्स हैदराबादने क्वालिफायर-1 चा सामना गमावला होता, पण त्यांनी क्वालिफायर-2 च्या सामन्यात विजय मिळवत फायनल गाठली, पण फायनलमध्ये त्यांचा केकेआरने पराभव केला.
advertisement
क्वालिफायर-2 मध्ये पंजाब किंग्स मुंबई किंवा गुजरात यांच्याविरुद्ध खेळेल. रविवार 2 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यातील विजेती टीम 3 जूनला आरसीबीविरुद्ध आयपीएल फायनल खेळेल. आयपीएल फायनलही अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL ची ट्रॉफी कोण उचलणार? 14 वर्षांच्या रेकॉर्डमुळे आधीच ठरला चॅम्पियन!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement