SRH vs RCB : पुण्याच्या बॉलरने कोहलीचा गेम केला,अर्धशतकापासून रोखलं, कोण आहे हा खेळाडू?

Last Updated:

विराट कोहलीने आक्रामक खेळी केली होती. मात्र अर्धशतक पुर्ण होण्याआधीच त्याच्या या आक्रामक खेळीला पुण्याच्या एका खेळाडू्ने ब्रेक लावला आहे. पुण्याच्या या खेळाडूने त्याची विकेट घेतली आहे.

harsh dube takes virat kohli wicket
harsh dube takes virat kohli wicket
SRH vs RCB : आयपीएलच्या आजच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 231 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे रॉयल चँलेजर्स बंगळुरुसमोर 232 धावांचे आव्हान आहे.या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने आक्रामक खेळी केली होती. मात्र अर्धशतक पुर्ण होण्याआधीच त्याच्या या आक्रामक खेळीला पुण्याच्या एका खेळाडू्ने ब्रेक लावला आहे. पुण्याच्या या खेळाडूने त्याची विकेट घेतली आहे. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे?हे जाणून घेऊयात.
विराट कोहली आक्रामक खेळी करत असताना 43 धावांवर त्याची विकेट पडली. हर्ष दुबेने त्याची विकेट घेतली आहे. त्यामुळे विराटच अर्धशतक हुकलं आहे. त्यामुळे हर्ष दुबे प्रचंड चर्चेत आला आहे.

कोण आहे हर्ष दुबे?

हर्ष दुबे हा विदर्भाचा 22 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहे. तो महाराष्ट्रातील पुणे येथे जन्मला असून, नागपूर येथे राहतो. त्याने डिसेंबर 2022 मध्ये रणजी ट्रॉफीमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
advertisement
2024-25 च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 69 विकेट्स घेऊन एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आणि विदर्भाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला या कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार मिळाला. आतापर्यंत त्याने 18 प्रथम श्रेणी सामन्यांत 97 विकेट्स घेतल्या आहेत आणि 705 धावा केल्या आहेत, ज्यात पाच अर्धशतके समाविष्ट आहेत.
advertisement
दरम्यान हर्ष दुबेने 2025 च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला 30 लाखांना संघात सामील केले.तसेच हर्ष दुबेने 16 मे 2025 रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघात स्थान मिळवले, जिथे तो अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. 2019 मध्ये त्याने अखेर भारतासाठी अंडर-19 संघाकडून खेळला होता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (w/c), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी एनगिडी, सुयश शर्मा
advertisement
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (w), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs RCB : पुण्याच्या बॉलरने कोहलीचा गेम केला,अर्धशतकापासून रोखलं, कोण आहे हा खेळाडू?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement