IPL 2025 : शुभमनला आयपीएल जिंकवण्यासाठी गुजरात टायटन्समध्ये 'गुरू'ची एन्ट्री, नेहराच्या मदतीला धावला वर्ल्ड जिंकवणारा जिगरी यार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yuvraj Singh in Gujarat Titans camp : आयपीएल 2025 च्या प्लेऑफपूर्वी युवराज सिंग गुजरात टायटन्सच्या संघात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Yuvraj Singh With shubhman gill : आयपीएल 2025 च्या लीग स्टेजमधील अखेरचा सामना आज (RCB vs LSG) खेळला जाणार आहे. अशातच आता गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत, परंतु जर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) हरवले, तर ते तिसऱ्या स्थानावर घसरू शकतात आणि त्यानंतर गुजरातला प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामना खेळावा लागेल. अशातच आता गुजरात टायटन्सच्या मदतीला शुभमन गिलचा गुरू पोहोचला आहे. तसेच आशिष नेहराचा जिगरी दोस्त आता मदतीला धावला आहे.
गुजरात टायटन्समध्ये कुणाची एन्ट्री?
आयपीएल 2025 च्या प्लेऑफपूर्वी युवराज सिंग गुजरात टायटन्सच्या संघात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. चंदीगढमध्ये गुजरात टायटन्सचा (GT) कर्णधार शुभमन गिलसोबत युवराजला पाहिल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. वर्ल्ड कप विजेत्या या खेळाडूने आता संघाच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुजरात टायटन्सने युवराज आणि शुभमन एकत्र चालतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
advertisement
Ki haal chaal, #TitansFAM? pic.twitter.com/yhnPEZTdJr
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 26, 2025
गुजरात टायटन्सने शेअर केली पोस्ट
गुजरातने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शनमध्ये "की हालचाल, #TitansFAM?" असं लिहिलं आहे. या फोटोमुळे युवराजच्या संभाव्य भूमिकेबद्दल अनेक तर्कवितर्क लावलं जात आहेत. गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केलं आहे. ते महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लनपूर येथे क्वालिफायर १ किंवा एलिमिनेटरमध्ये खेळतील.
advertisement
युवराज सिंगची गुजरात टायटन्समध्ये...!
युवराज आशिष नेहरा यांच्या जागी टायटन्सचा नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत होता. युवराजचे नेहरा आणि शुभमन दोघांसोबत चांगले संबंध आहेत. विशेषतः कोविड-१९ महामारीच्या काळात त्याने शुभमनला त्याच्या फलंदाजीचे कौशल्य सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. युवराज सिंगने टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि दोन आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. त्याचा हा अनुभव संघाला प्लेऑफमध्ये नक्कीच उपयोगी पडेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Location :
Gujarat
First Published :
May 27, 2025 12:40 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : शुभमनला आयपीएल जिंकवण्यासाठी गुजरात टायटन्समध्ये 'गुरू'ची एन्ट्री, नेहराच्या मदतीला धावला वर्ल्ड जिंकवणारा जिगरी यार!