मुंबई इंडियन्स-राजस्थाननंतर आणखी एक संघ महाराष्ट्रात, तिसऱ्या IPL टीमने बनवलं होम ग्राऊंड!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर आणखी एका आयपीएल टीमने महाराष्ट्रामध्ये आपलं होम ग्राऊंड बनवलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या क्रिकेट चाहत्यांना यंदा आयपीएलच्या जास्त सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.
मुंबई : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर आणखी एका आयपीएल टीमने महाराष्ट्रामध्ये आपलं होम ग्राऊंड बनवलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या क्रिकेट चाहत्यांना यंदा आयपीएलच्या जास्त सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सचं होम ग्राऊंड हे आधीच वानखेडे स्टेडियम आहे, त्यानंतर राजस्थान रॉयल्सने पुण्यातील गहुंजे स्टेडियमला आपलं होम ग्राऊंड केलं आहे. आता आरसीबीचे आयपीएल 2026 चे सामनेही मुंबईमध्ये होणार आहेत.
आरसीबीचे आयपीएल 2026 चे सामने नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि रायपूरच्या स्टेडियममध्ये होणार आहेत. आरसीबी त्यांचे 5 सामने नवी मुंबईमध्ये आणि 2 सामने रायपूरमध्ये खेळणार आहे. आरसीबी मॅनेजमेंटचं संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
आरसीबीला चिन्नास्वामीमध्ये परवानगी नाही
आरसीबीला त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळण्याची परवानगी मिळाली नाही. आयपीएल 2025 मध्ये विजय मिळवल्यानंतर आरसीबीने विजयोत्सव साजरा केला, तेव्हा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली, यामध्ये 11 चाहत्यांचा मृत्यू झाला तर 56 जण जखमी झाले. यानंतर कर्नाटक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने घ्यायची परवानगी नाकारली आहे, त्यामुळे आता आरसीबी आयपीएल 2026 चे सामने महाराष्ट्रात खेळणार आहे.
advertisement
राजस्थानचे सामने पुण्यात
दुसरीकडे आयपीएलच्या मागच्या मोसमात राजस्थान रॉयल्सचे राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत (आरसीए) वाद झाले होते. यानंतर आरसीएच्या एका अधिकाऱ्याने राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले, याची तक्रार राजस्थान रॉयल्सने बीसीसीआयकडे केली होती. यानंतर आता राजस्थान रॉयल्स त्यांचे सामने पुणे आणि गुवाहाटीमध्ये खेळणार आहे.
कधी सुरू होणार आयपीएल?
आयपीएल 2026 ला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे, तर 31 मे ला आयपीएलची फायनल होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 6:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मुंबई इंडियन्स-राजस्थाननंतर आणखी एक संघ महाराष्ट्रात, तिसऱ्या IPL टीमने बनवलं होम ग्राऊंड!








