IPL 2026 : 7 खेळाडू कायम इन्जुअर्ड, मैदानात कोण उतरणार? ऑक्शनमध्ये लखनऊने कुऱ्हाडीवर पाय मारला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएलच्या लिलावामध्ये सर्व टीमनी त्यांच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे खेळाडू विकत घेतले, पण लखनऊ सुपर जाएंट्सने विकत घेतलेल्या टीमवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा लिलाव मंगळवारी अबूधाबीमध्ये पार पडला. या लिलावामध्ये कॅमरून ग्रीन हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सनी ऑस्ट्रेलियाच्या या ऑलराऊंडरसाठी तब्बल 25.20 कोटी रुपये मोजले. तर प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा लिलावामध्ये सर्वाधिक बोली लागणारे भारतीय खेळाडू ठरले. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्यासाठी सीएसकेने प्रत्येकी 14.20 कोटी रुपये मोजले. याचसोबत प्रशांत आणि कार्तिक आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडे अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरले.
लखनऊकडे 7 इन्जुअर्ड खेळाडू
आयपीएलच्या या मिनी लिलावामध्ये सर्व टीमनी त्यांच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे खेळाडू विकत घेतले, पण लखनऊ सुपर जाएंट्सने विकत घेतलेल्या टीमवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे, कारण त्यांच्याकडे असलेल्या तब्बल 7 खेळाडूंचा एकसारखी दुखापत व्हायचा इतिहास आहे. तर लिलावामध्ये ज्या खेळाडूसाठी लखनऊने 8.60 कोटी मोजले तो खेळाडू फक्त 4 सामन्यांसाठी उपलब्ध राहणार आहे.
advertisement
लखनऊ सुपर जाएंट्सने लिलावामध्ये 18.40 कोटी रुपये खर्च केले, यात त्यांनी 6 खेळाडू टीममध्ये घेतले. आयपीएल लिलावानंतर आता लखनऊच्या पर्समध्ये 4.55 कोटी रुपये शिल्लक आहेत. लखनऊकडे सध्या असलेल्या खेळाडूंपैकी 7 खेळाडू याआधी अनेकदा दुखापतग्रस्त झाले आहेत, त्यामुळे आयपीएलच्या मागच्या मोसमातही लखनऊ यामुळे अडचणीत आली होती.
ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्श हा दुखापतीमुळे बॉलिंग करू शकत नाही. या कारणामुळे मार्शची ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीममध्येही निवड होत नाही, अखेर त्याने ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. मार्श याआधीही दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धा खेळू शकला नव्हता. याशिवाय मोहम्मद शमीलादेखील मागच्या काही काळापासून फिटनेसच्या समस्यांनी ग्रासलं आहे. फिटनेसमुळे शमी भारतीय टीममधूनही बाहेर आहे. तसंच फिटनेस आणि खराब कामगिरीमुळे सनरायजर्स हैदराबादने शमीला लखनऊसोबत ट्रेड केलं.
advertisement
हसरंगा-नॉर्कियावर बोली
लखनऊने आयपीएल लिलावामध्ये वानिंदू हसरंगा आणि एनरिक नॉर्कियाला विकत घेतलं. श्रीलंकेचा लेग स्पिनर असलेल्या हसरंगाला लखनऊने 2 कोटींना आणि दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियालाही 2 कोटींना विकत घेतलं. नॉर्किया आणि हसरंगादेखील दुखापतींमुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर होते.
आयपीएल रिटेनशनमध्ये लखनऊने आवेश खान, मयंक यादव आणि मोहसिन खान यांना रिटेन केलं होतं. मयंक यादव दुखापतीमुळे मागच्या आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. तर आवेश खान आणि मोहसिन खान यांनाही दुखापतींमुळे लखनऊकडून बरेच सामने खेळता आले नाहीत.
advertisement
इंग्लिस 4 मॅच खेळणार
ऑस्ट्रेलियाचा विकेट कीपर जॉश इंग्लिससाठी लखनऊने तब्बल 8.60 कोटी रुपये खर्च केले. जॉश इंग्लिस हा यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त 4 सामने खेळणार आहे, याच कारणामुळे पंजाबने इंग्लिसला रिलीज केलं होतं. जॉश इंग्लिस लग्न करणार असल्यामुळे आयपीएलच्या बहुतेक सामन्यांसाठी उपलब्ध नसेल.
लखनऊकडे ऋषभ पंत, निकोलस पूरन, मॅथ्यू ब्रीट्झकी, मुकूल चौधरी हे चार विकेट कीपर असताना त्यांनी फक्त 4 सामन्यांसाठी उपलब्ध असलेल्या जॉश इंग्लिसवर 8.60 कोटींची बोली का लावली? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 6:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 7 खेळाडू कायम इन्जुअर्ड, मैदानात कोण उतरणार? ऑक्शनमध्ये लखनऊने कुऱ्हाडीवर पाय मारला!







