VIDEO : W,W,W... 2 करोडच्या बॉलरचा डेब्यू सामन्यात राडा, 14 बॉलमध्ये काव्याच्या टीमला गुडघ्यावर आणलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आरसीबीकडून डेब्यू करणाऱ्या खेळाडूने धुमाकुळ घातला आहे. कारण या खेळाडूने अवघ्या 14 बॉलमध्ये तीन विकेट घेतल्या होता. विशेष म्हणजे हे तीनही खेळाडू सर्वात घातक होते.
RCB vs SRH, IPL 2026 : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात एका आरसीबीकडून डेब्यू करणाऱ्या खेळाडूने धुमाकुळ घातला आहे. कारण या खेळाडूने अवघ्या 14 बॉलमध्ये तीन विकेट घेतल्या होता. विशेष म्हणजे हे तीनही खेळाडू सर्वात घातक होते.त्यामुळे हे तीन विकेट घेऊन त्याने सनरायझर्स हैदराबादला गुडघ्यावर आणलं होतं. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकॉब डफीला आरसीबीने 2 करोडच्या किमतीत ताफ्यात घेतलं होतं. आज त्याने आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात डेब्यू केला होता. आणि या डेब्यू सामन्यातच त्याने धुमाकूळ घातला होता. कारण त्याने त्याच्या दुसऱ्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अभिषेक शर्माला 7 धावांवर बाद केले होते.त्यानंतर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ट्रेविस हेडला 11 धावांवर बाद केले होते. अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या दोन्ही सलामीविरांना बाद केले होते.
advertisement
THE ARRIVAL OF JACOB DUFFY IN THE IPL. pic.twitter.com/9lQtGNUrql
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 28, 2026
यानंतर जेकॉब डफीने पुन्हा त्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये नितीश रेड्डीला 1 धावांवर बाद केले होते.अशाप्रकारे त्याने 14 बॉलमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादची अवस्था ही 15 धावांवर 3 विकेट अशी झाली होता. त्यानंतक डफीने आणखी 10 बॉल होते. पण त्यात त्याला विकेट मिळाली.
advertisement
जेकॉब डफीने त्याच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 22 धावा देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. डफीने त्याच्या सगळ्या ओव्हर या पॉवर प्लेमध्येच टाकल्या होत्या. त्यामुळे हैदराबाद फक्त 54 धावाच करू शकली होती.
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा
advertisement
हैदराबादची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर-कर्णधार), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 8:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : W,W,W... 2 करोडच्या बॉलरचा डेब्यू सामन्यात राडा, 14 बॉलमध्ये काव्याच्या टीमला गुडघ्यावर आणलं









