Navi Mumbai News: काळोखातही स्पष्ट दिसणार चेहरा, नवी मुंबईत रात्रीच्या अंधारातही सुटणार नाही कुणी; पालिकेचा सर्वात मोठा निर्णय
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये, कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरामध्ये सीसीटीव्ही प्रणाली बसवण्यात येत आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये, कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महानगर पालिका क्षेत्रामध्ये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण शहरामध्ये एक अत्याधुनिक सुविधेने सुसज्ज असलेली सीसीटीव्ही प्रणाली बसवण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. लवकरात लवकर नवी मुंबई शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार असल्याचे एका महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
नवी मुंबई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी एकूण तब्बल 1524 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्यापैकी 1411 कॅमेरे आधीच बसवण्यात आले आहेत. सध्या 1043 कॅमेरे कार्यरत आहेत, तर टेक्निकल कारणांमुळे 368 कॅमेरे बंद आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरू असलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी फायबर ऑप्टिक केबल्सचे (Fibre Optic Cables) नुकसान झाले आहे. लाईट कनेक्शनमुळे काही कॅमेऱ्यांमध्ये बिघाड झाला आहे. सर्व बंद पडलेले कॅमेरे लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
advertisement
“सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नेटवर्कमुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल,” असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठीचा निधी संपूर्णपणे महानगरपालिका आपल्या बजेटमधून पुरवत आहे. High Defination Resolution आणि ॲडव्हान्स लेन्सच्या माध्यमातून कॅमेरा महापालिका क्षेत्रात बसवण्यात येणार आहे. त्याचा फायदा नवी मुंबईकरांना होणार आहे. महापालिकेतर्फे बसवण्यात येणार्या कॅमेऱ्यामध्ये इन्फ्रारेड आणि Low Light Sensors बसवले गेले आहेत. ज्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा काळोखाच्या वेळी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसण्याची शक्यता आहे.
advertisement
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे परिसरामध्ये 24 तास पाळत ठेवण्यासाठी मदत होईल. गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी मदत होऊ शकते. नवी मुंबई आयुक्त कार्यालयामध्ये एक स्पेशल रूम उभारण्यात येत आहे, जिथून दिवसभर सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर निगराणी केली जाईल.
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 8:59 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Navi Mumbai News: काळोखातही स्पष्ट दिसणार चेहरा, नवी मुंबईत रात्रीच्या अंधारातही सुटणार नाही कुणी; पालिकेचा सर्वात मोठा निर्णय









