advertisement

IPL 2026 : 6 फूट 8 इंचाचं वादळ आयपीएलमध्ये आलं! झिम्बाब्वेचा मुझरबानी पुन्हा बॅट्समनना घाम फोडणार

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये वादळी बॉलिंग करणाऱ्या झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानीची आयपीएलमध्ये निवड झाली आहे.

6 फूट 8 इंचाचं वादळ आयपीएलमध्ये आलं! झिम्बाब्वेचा मुझरबानी पुन्हा बॅट्समनना घाम फोडणार
6 फूट 8 इंचाचं वादळ आयपीएलमध्ये आलं! झिम्बाब्वेचा मुझरबानी पुन्हा बॅट्समनना घाम फोडणार
कोलकाता : टी-20 वर्ल्ड कपमध्ये वादळी बॉलिंग करणाऱ्या झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानीची आयपीएलमध्ये निवड झाली आहे. 6 फूट 8 इंचाचा हा फास्ट बॉलर आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळताना दिसणार आहे. शाहरुख खानच्या केकेआरने ब्लेसिंग मुझरबानीला टीममध्ये घेतलं आहे. केकेआरने सोशल मीडियावर पोस्ट करून मुझरबानीला टीममध्ये घेतल्याची घोषणा केली आहे.
मुझरबानीची ताकद ही त्याची उंची आणि उंचीमुळे मिळणारा बाऊन्स आहे. '6 फूट 8 इंचाचा हा खेळाडू झिम्बाब्वेचा प्रमुख फास्ट बॉलर म्हणून समोर आला आहे. इनिंगच्या महत्त्वाच्या टप्प्यावर विकेट मिळवण्याची क्षमता असलेला मुझरबानी आमची फास्ट बॉलिंग आणखी आक्रमक करेल', अशी प्रतिक्रिया केकेआरने दिली आहे.

मुझरबानीचं उत्कृष्ट रेकॉर्ड

मुझरबानीचं टी-20 क्रिकेटमधलं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. 80 पेक्षा जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेल्या मुझरबानीने 90 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. मुझरबानीची बॉलिंग सरासरी 21 ची आहे. 8 रन देऊन 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मुझरबानीच्या दमदार कामगिरीमुळे झिम्बाब्वेने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीमचा पराभव करून सुपर-8 मध्ये प्रवेश केला होता.
advertisement

केकेआरमध्ये मुझरबानीची एन्ट्री

ब्लेसिंग मुझरबानी 17 मार्चला कोलकात्यामध्ये येईल आणि केकेआरच्या कॅम्पमध्ये दाखल होईल. आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होत आहे. केकेआरचा पहिला सामना 29 मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
हर्षित राणा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे, तर मथीशा पथिराणा हा दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. याशिवाय बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमान याचीही आयपीएलमधून हकालपट्टी झाली आहे, त्यामुळे केकेआरकडे एकही आंतरराष्ट्रीय फास्ट बॉलर नव्हता. केकेआरने मुस्तफिजुरचा बदली खेळाडू म्हणून ब्लेसिंग मुझरबानीची निवड केली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 6 फूट 8 इंचाचं वादळ आयपीएलमध्ये आलं! झिम्बाब्वेचा मुझरबानी पुन्हा बॅट्समनना घाम फोडणार
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement