IPL Auction 2026 : कधी, कुठे आणि किती वाजता? आयपीएल ऑक्शनसाठी कुणाकडे किती रक्कम बाकी? जाणून घ्या सर्व डिटेल्स

Last Updated:

IPL Auction 2026 live streaming Date time venue : सर्वाधिक रक्कम कोलकाता नाइट रायडर्सकडे असून, त्यांना 13 खेळाडू खरेदी करायचे आहेत. तर सर्वात कमी 2.75 कोटी इतकी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे.

IPL Auction 2026 live streaming Date time venue
IPL Auction 2026 live streaming Date time venue
IPL Auction 2026 live : इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या मिनी-ऑक्शनची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 10 टीम्स आपल्या स्क्वॉडला अधिक मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम प्लेयर्सच्या शोधात आहेत. यंदाच्या आयपीएल लिलावात भरल्या जाणाऱ्या 77 स्लॉट्ससाठी सर्व फ्रँचायझींकडे मिळून तब्बल 237.55 कोटी इतकी रक्कम उपलब्ध आहे. यामध्ये परदेशी खेळाडूंसाठी 27 स्लॉट्स रिक्त आहेत.

कुणाकडे सर्वात जास्त रक्कम?

सर्वाधिक रक्कम कोलकाता नाइट रायडर्सकडे असून, त्यांना 13 खेळाडू खरेदी करायचे आहेत. तर सर्वात कमी 2.75 कोटी इतकी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, ज्यामुळे त्यांना खूप विचारपूर्वक खरेदी करावी लागेल.

कधी आणि कुठे असेल ऑक्शन?

आयपीएल 2026 चा लिलाव मंगळवार, 16 डिसेंबर रोजी होणार आहे. दुपारी अडीच वाजता हा लिलाव सुरू होईल. आयपीएल 2026 चा लिलाव अबू धाबी, यूएई येथे होत आहे. मागील दोन लिलाव भारताबाहेर जेद्दाह (2024) आणि दुबई (2023) येथेही झाले आहेत.
advertisement

कुठं लाईव्ह पाहता येईल ऑक्शन?

आयपीएल 2026 च्या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर होईल. आयपीएल 2026 चा लिलाव जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल, इथं तुम्ही लाईव्ह पाहू शकता.

कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी?

कोलकाता नाईट रायडर्स - 64.3 कोटी रुपये (13 जागा शिल्लक)
advertisement
चेन्नई सुपर किंग्ज - 43.4 कोटी रुपये (9 जागा शिल्लक)
गुजरात टायटन्स - 12.9 कोटी रुपये (5 जागा शिल्लक)
सनरायझर्स हैदराबाद - 25.5कोटी रुपये (10 जागा शिल्लक)
पंजाब किंग्ज - 11.5 कोटी रुपये (4 जागा शिल्लक)
लखनऊ सुपर जायंट्स - 22.95 कोटी रुपये (6 जागा शिल्लक)
दिल्ली कॅपिटल्स - 21.8 कोटी रुपये (8 जागा शिल्लक)
advertisement
मुंबई इंडियन्स - 2.75 कोटी रुपये (5 जागा शिल्लक)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - 16.4 कोटी रुपये (8 जागा शिल्लक)
राजस्थान रॉयल्स - 16.05 कोटी रुपये (9 जागा शिल्लक)
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026 : कधी, कुठे आणि किती वाजता? आयपीएल ऑक्शनसाठी कुणाकडे किती रक्कम बाकी? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Next Article
advertisement
Tejasvee Ghosalkar Join BJP: तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

View All
advertisement