IPL संपताच क्रिकेटपटूला झटका, KKR चा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, वर्ल्ड कप विजेत्याचं काळं कृत्य!

Last Updated:

मॅच फिक्सिंग प्रकरणी हायकोर्टाने टी-20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूला दोषी ठरवलं आहे. श्रीलंकेचा माजी ऑफ स्पिनर सचित्रा सेनानायके याला हंबनटोटा हायकोर्टाने मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवलं आहे.

IPL संपताच क्रिकेटपटूला झटका, KKR चा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, वर्ल्ड कप विजेत्याचं काळं कृत्य!
IPL संपताच क्रिकेटपटूला झटका, KKR चा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, वर्ल्ड कप विजेत्याचं काळं कृत्य!
मुंबई : मॅच फिक्सिंग प्रकरणी हायकोर्टाने टी-20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूला दोषी ठरवलं आहे. श्रीलंकेचा माजी ऑफ स्पिनर सचित्रा सेनानायके याला हंबनटोटा हायकोर्टाने मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवलं आहे. सचित्रा सेनानायके याच्यावर 2020 च्या लंका प्रीमियर लीग (एलपीएल) मध्ये मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. सेनानायकेने एलपीएलमध्ये एका सहकारी खेळाडूला मॅच फिक्सिंगची ऑफर दिली होती. श्रीलंकेमध्ये नुकताच भ्रष्टाचारविरोधी कायदा लागू झाल्यानंतर मॅच फिक्सिंग प्रकरणात एखाद्या राष्ट्रीय खेळाडू दोषी आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे.
सेनानायकेला अटक केल्यानंतर 2023 साली जामीन मिळाला होता, पण आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढणार आहेत. 40 वर्षीय सेनानायकेने 2012 ते 2016 पर्यंत श्रीलंकेसाठी 1 टेस्ट, 49 वनडे आणि 24 टी-20 मॅच खेळल्या, ज्यात त्याने 78 विकेट घेतल्या. सेनानायके 2014 सालच्या श्रीलंकेच्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग होता. श्रीलंकेतील स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार सेनानायकेने श्रीलंकेचा आणखी एक राष्ट्रीय खेळाडू थारिंडु रत्नायके याला मॅच फिक्सिंगसाठी संपर्क केला होता, जेव्हा तो कोलंबो किंग्सकडून खेळत होता.
advertisement

दुबईतून केला फोन

श्रीलंकेच्या 'डेली मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार सेनानायकेने 2020 साली एलपीएलमध्ये खेळणाऱ्या दोन क्रिकेटपटूंना दुबईहून फोन केला होता आणि त्यांना मॅच फिक्सिंग करण्याची ऑफर दिली.

KKR कडून खेळला सेनानायके

सचित्रा सेनानायके आयपीएल 2013 साली केकेआरकडून खेळला होता. आयपीएल 2013 च्या 8 सामन्यांमध्ये सेनानायकेने 9 विकेट घेतल्या होत्या, तसंच ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये सेनानायके सिडनी सिक्सर्सकडून खेळला, यातल्या 2 सामन्यांमध्ये त्याला 1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL संपताच क्रिकेटपटूला झटका, KKR चा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी, वर्ल्ड कप विजेत्याचं काळं कृत्य!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement