Iran-Israel War : आरडाओरड, पळापळ अन् किंकाळ्या! इस्त्राईलच्या हल्ल्यात PV Sindhu थोडक्यात बचावली, सांगितला एअरपोर्टवरचा थरार
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PV Sindhu narrowly escapes Israeli attack : इस्रायलच्या हल्ल्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू थोडक्यात बचावली आहे. सोशल मीडियावर तिने याची माहिती दिली.
Iran-Israel War PV Sindhu : इस्रायल आणि अमेरिकेने शनिवारी इराणमधील राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला अन् जगात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ही तिसऱ्या महायुद्धाला सुरूवात तर नाही ना? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. त्यातच आता इस्रायलच्या हल्ल्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू थोडक्यात बचावली आहे. सोशल मीडियावर तिने याची माहिती दिली.
काय म्हणाली PV Sindhu?
काही तासांपूर्वी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो, त्या अगदी जवळच एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे सगळीकडे धूर आणि ढिगारा साचला होता. विशेष म्हणजे पीव्ही सिंधूचे कोच या धुराच्या आणि ढिगाऱ्याच्या अगदी जवळ होते, ज्यामुळे त्यांना तिथून जीवाच्या आकांताने पळावे लागले. हा क्षण सर्वांसाठी अत्यंत तणावाचा आणि भीतीदायक होता, असं पीव्ही सिंधू हिने म्हटलं आहे.
advertisement
The ordeal continues to unfold, and the situation is becoming more frightening by the hour.
A few hours ago, there was an explosion close to where we were holed up at the airport. My coach had to quickly run out of the area as he was closest to the smoke and debris. It was an… https://t.co/ZdNtuALk0P
— Pvsindhu (@Pvsindhu1) March 1, 2026
advertisement
सुदैवाने, पीव्ही सिंधू आणि तिची संपूर्ण टीम आता सुरक्षित असून त्यांना अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दुबई विमानतळ कर्मचारी आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमांमुळे आमचा जीव वाचला, असे सिंधूने सांगितले. या कठीण काळात दुबईतील इंडियन हायकमिशनने दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आणि सततच्या मदतीबद्दल तिने विशेष आभार मानले आहेत.
advertisement
सध्या ही संपूर्ण टीम या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असून थोडा वेळ विश्रांती घेत आहे. परिस्थिती निवळण्याची आणि सर्व काही सुरळीत होण्याची ते वाट पाहत आहेत. "आम्ही सुरक्षित आहोत आणि आशा सोडून दिलेली नाही," अशा शब्दांत सिंधूने आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. या घटनेमुळे 2026 च्या या क्रीडा हंगामात भारतीय खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
सध्या, आम्ही परिस्थिती निवळण्याची वाट पाहत असताना थोडी विश्रांती घेण्याचा आणि आशेवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सुरक्षित आहोत आणि आशा सोडून दिलेली नाही, असंही पीव्ही सिंधू म्हणाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 8:26 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Iran-Israel War : आरडाओरड, पळापळ अन् किंकाळ्या! इस्त्राईलच्या हल्ल्यात PV Sindhu थोडक्यात बचावली, सांगितला एअरपोर्टवरचा थरार










