संजू सॅमसन IPL मध्ये कुणाकडून खेळणार? एका Photo ने उडवली राजस्थानची झोप
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून खेळू इच्छित नसल्याचं वृत्त आयपीएल 2025 संपताच समोर आलं होतं, याबाबत संजूने राजस्थानसोबत चर्चा केली असल्याचंही बोललं गेलं.
मुंबई : आयपीएल 2026 मध्ये संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून खेळू इच्छित नसल्याचं वृत्त आयपीएल 2025 संपताच समोर आलं होतं, याबाबत संजूने राजस्थानसोबत चर्चा केली असल्याचंही बोललं गेलं. आता आयपीएल 2026 साठी सर्व टीमकडून तयारीला सुरूवात झाली आहे. 15 डिसेंबरच्या आसपास आयपीएल 2026 साठीचा लिलाव आहे, यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत टीमना त्यांनी रिटेन केलेले खेळाडू आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या काही दिवसात संजू राजस्थानकडून खेळणार का नाही? याचा सस्पेन्स संपणार आहे.
संजू आयपीएल 2026 मध्ये आरसीबीकडून खेळणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत, त्याला कारण ठरत आहे एक फोटो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी-20 मॅचच्या सीरिजला 29 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. संजू सॅमसन भारताच्या टी-20 टीमचा भाग आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 सीरिज सुरू व्हायला अजून एक आठवडा आहे, पण त्याआधी संजू आरसीबचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट गॅब्रिएलसोबत दिसला आहे.
advertisement
भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजआधी संजूने गॅब्रिएलसोबत कसून नेट प्रॅक्टिस केली. आयपीएल 2026 साठी आपल्याला ट्रेड करावे किंवा रिलीज करावे, अशी मागणी संजूने राजस्थान रॉयल्सकडे केल्याचं वृत्त ऑगस्ट महिन्यात क्रिकबझने दिलं होतं. संजूचे राजस्थान रॉयल्ससोबत मतभेद झाले, तसंच जॉस बटलरला रिलीज करण्यावरूनही संजू नाराज असल्याचं या वृत्तात सांगण्यात आलं होतं.

advertisement
संजू सॅमसनला ट्रेड करण्यासाठी राजस्थान रॉयल्स तयार आहे, यासाठी त्यांनी अनेक फ्रँचायझींना पत्रही लिहिलं आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 च्या लिलावाआधी जॉस बटलरला रिलीज केलं. बटलरने आयपीएलच्या 7 मोसमांमध्ये राजस्थान रॉयल्सकडून 83 सामन्यांमध्ये 3,055 रन केल्या.
बटलरच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही त्याला रिलीज करण्यात आलं, यावरून संजू नाराज झाला होता. यावर संजूने स्टार स्पोर्ट्ससोबत बोलतानाही नाराजी व्यक्त केली होती. बटलरला जाऊ देणं हा माझ्यासाठी घेतलेला सर्वात आव्हानात्मक निर्णयांपैकी एक आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजवेळी आम्ही रात्री जेवत होतो, तेव्हा मी अजूनही यातून बाहेर पडलो नसल्याचं त्याला सांगितलं होतं. जर मला आयपीएलमध्ये एखादा नियम बदलायचा असेल, तर दर तीन वर्षांनी खेळाडूंना सोडण्याचा नियम मी बदलेन, असं संजू म्हणाला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 11:27 PM IST