SRH vs RCB : घामाने अंघोळ केली पण पुसायला इशानकडे रुमालच नव्हता, मग जितेशने जे केलं...फॅन्सची मन जिंकली

Last Updated:

अर्धशतकानंतर ईशान किशन घामाने इतका ओलाचिंब झाला होता की त्याच्याकडे पुसायला रुमान नव्हता. यावेळी ईशानची ही अवस्था पाहून विकेटमागे उभ्या असलेल्या जितेश शर्माने त्याच्याकडील रुमाल देऊन खेळभावनाच दर्शन घडवलं.

ishan kishan jitesh sharma
ishan kishan jitesh sharma
SRH vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजीला उतरली आहे. यावेळी हैदराबादची सूरूवात खूपच चांगली झाली होती.या सामन्यात ईशान किशनने अर्धशतक ठोकलं आहे. या अर्धशतकानंतर ईशान किशन घामाने इतका ओलाचिंब झाला होता की त्याच्याकडे पुसायला रुमान नव्हता. यावेळी ईशानची ही अवस्था पाहून विकेटमागे उभ्या असलेल्या जितेश शर्माने त्याच्याकडील रुमाल देऊन खेळभावनाच दर्शन घडवलं.
खरं तर कृणाल पंड्याच्या 14 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर ईशान किशने अर्धशतक पुर्ण केले होते. या हे अर्धशतक करताना तो प्रचंड घामाघुम झाला होता. मात्र त्याच्याकडे घाम पुसायला रूमालच नव्हता.त्यामुळे तो टीशर्टच्या माध्यमातून घाम पुसत होता.
ही गोष्ट विकेटमागे उभ्या असलेल्या जितेश शर्माने पाहून तत्काळ आपल्याकडील रुमाल त्याला देऊ केला. ज्यामुळे ईशान किशनला घाम पुसता आला.त्यामुळे जितेश शर्माने खेळभावना जपली होती. आता जितेशच्या या कृतीच सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा (w/c), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, लुंगी एनगिडी, सुयश शर्मा
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (w), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs RCB : घामाने अंघोळ केली पण पुसायला इशानकडे रुमालच नव्हता, मग जितेशने जे केलं...फॅन्सची मन जिंकली
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement