Jasprit Bumrah : शांत, संयमी बुमराह भडकला, अक्कल शिकवणाऱ्या कैफला सुनावलं, एका वाक्यात खणखणीत पलटवार!

Last Updated:

टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह याने भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

शांत, संयमी बुमराह भडकला, अक्कल शिकवणाऱ्या कैफला सुनावलं, एका वाक्यात खणखणीत पलटवार!
शांत, संयमी बुमराह भडकला, अक्कल शिकवणाऱ्या कैफला सुनावलं, एका वाक्यात खणखणीत पलटवार!
दुबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह याने भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याच्यावर जोरदार पलटवार केला आहे. जसप्रीत बुमराह दुखापत होऊ नये म्हणून पॉवर प्ले मध्येच 3 ओव्हर टाकत असल्याचा दावा मोहम्मद कैफने केला होता. कैफने याबद्दल सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टवरच जसप्रीत बुमराहने रिप्लाय देऊन मोहम्मद कैफचा दावा खोडून काढला आहे.

काय म्हणाला मोहम्मद कैफ?

'रोहित कर्णधार असताना बुमराह 1, 13, 17 आणि 19 अशा ओव्हर टाकायचा. सूर्या कर्णधार असताना बुमराह आशिया कपमध्ये सुरूवातीलाच 3 ओव्हर टाकत आहे. दुखापत टाळण्यासाठी बॉडी वॉर्म अप झाल्यानंतर बुमराह पहिल्याच स्पेलमध्ये 3 ओव्हर टाकतोय. उरलेल्या 14 ओव्हरमध्ये बुमराहची एक ओव्हर, विरोधी टीमच्या बॅटरना दिलासादायक आहे. वर्ल्ड कपमध्ये दिग्गज टीमविरुद्ध हे टीम इंडियाला त्रासदायक ठरू शकतं', असं मोहम्मद कैफ म्हणाला होता.
advertisement
मोहम्मद कैफच्या याच पोस्टवर जसप्रीत बुमराहने प्रतिक्रिया दिली आहे. 'आधीही चुकीचं आणि आताही चुकीचं', असा रिप्लाय बुमराहने मोहम्मद कैफच्या पोस्टवर दिला आहे. आशिया कपमध्ये टीम इंडिया बुमराह आणि हार्दिक पांड्या या दोन फास्ट बॉलरसोबतच खेळत आहे. दुबईमधील खेळपट्टी स्पिन बॉलिंगला अनुकूल असल्यामुळे भारतीय टीमच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये 3 स्पिनर आहेत, त्यामुळे बुमराह पॉवर-प्लेमध्येच 3 ओव्हर टाकत आहे.
advertisement

पाकिस्तानविरुद्ध बुमराहचा संघर्ष

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहला संघर्ष करावा लागला. या सामन्यात बुमराहने त्याच्या 4 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 45 रन दिल्या. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मात्र बुमराहने धमाकेदार कमबॅक केला. या सामन्यात बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 18 रन देऊन 2 विकेट घेतल्या.
advertisement

बुमराहची टीम इंडियात निवड

आशिया कप संपल्यानंतर 4 दिवसांमध्येच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरूवात होत आहे. या सीरिजसाठीही बुमराहची निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये बुमराह 3 मॅच खेळला होता, त्यावरून बराच वाद झाला होता. बुमराह संपूर्ण सीरिजसाठी फिट असेल तरच त्याची टीम इंडियात निवड व्हावी, असं मतही अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं होतं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jasprit Bumrah : शांत, संयमी बुमराह भडकला, अक्कल शिकवणाऱ्या कैफला सुनावलं, एका वाक्यात खणखणीत पलटवार!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement