IPL 2026 पूर्वी LSG चा मोठा डाव! आयपीएलसाठी ऋषभ पंतने बोलवला 'मामा', संजीव गोएंकांचा आनंद गगनात मावेना
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kane Williamson Joined LSG : आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपरजायंट्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये केन विल्यमसनला त्यांच्या संघात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
LSG Strategic Advisor In IPL 2026 : आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्यास अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मात्र, आयपीएलचा मिनी-लिलाव लवकरच होणार आहे आणि जवळजवळ सर्व आयपीएल फ्रँचायझी या मिनी लिलावाची (IPL 2026 Auction) तयारी करत आहेत. अशातच आता लखनऊ सुपर जाएन्ट्स संघाने मोठी खेळी केली असून केन विलियम्सन (Kane Williamson Joined LSG) याला सामील करून घेतलं आहे. आगामी लिलावापूर्वी केन लनखऊमध्ये सामील झाला आहे.
केन विल्यमसनवर मोठी जबाबदारी
आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपरजायंट्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये केन विल्यमसनला त्यांच्या संघात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनला संघाचा धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. केन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केले आहे. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडूनही खेळला आहे.
advertisement
फ्रँचायझी मालक संजीव गोएंका म्हणतात...
केन विलियम्सन हा लखनऊ सुपर जायंट्स कुटुंबाचा एक भाग आहे आणि लखनऊसाठी स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझर म्हणून त्याच्या नवीन भूमिकेत त्याचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. त्याचं नेतृत्व, स्ट्रॅटेजिक अंतर्दृष्टी, खेळाची सखोल समज आणि खेळाडूंना प्रेरणा देण्याची क्षमता त्याला संघात एक अमूल्य भर घालत आहे, असं संजीव गोएंका म्हणाले आहेत.
advertisement
Kane has been a part of the Super Giants family and it’s an absolute delight to welcome him in his new role as Strategic Advisor for @LucknowIPL. His leadership, strategic insight, deep understanding of the game, and ability to inspire players make him an invaluable addition to… pic.twitter.com/80EGl4SrmA
— Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) October 16, 2025
advertisement
आयपीएलचा लिलाव कधी होणार?
मागील दोन लिलाव परदेशात आयोजित करण्यात आले होते. 2023 मध्ये दुबईत आणि 2024 मध्ये सौदी अरेबियातील जेद्दाह येथे लिलाव पार पडला होता. मात्र, यावेळेस लिलाव परदेशात घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही. फ्रँचायझींच्या सूत्रांनुसार, बीसीसीआय या मिनी-लिलावाचे आयोजन भारतातच करेल. मात्र, याबाबतही अधिकृत निर्णय होणं बाकी आहे. आयपीएलच्या मिनी लिलावासाठी प्रत्येक फ्रँचायझीला रिटेन्शन लिस्ट जाहीर करावी लागणार आहे. त्यासाठी देखील बीसीसीआयने तारीख जाहीर केली आहे. प्रत्येक फ्रँचायझीला 15 नोब्हेंबरपर्यंत खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहे. यंदाचा लिलाव मिनी लिलाव असल्याने मोठे खेळाडू लिलावात नसतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 पूर्वी LSG चा मोठा डाव! आयपीएलसाठी ऋषभ पंतने बोलवला 'मामा', संजीव गोएंकांचा आनंद गगनात मावेना