IPL 2026 : बापाने पै पै गोळा केले, पोरानं कष्टाच चीज केलं, आयपीएलमध्ये नशीब चमकलं, काव्याच्या SRH मधून खेळणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ठाणे जिल्ह्यातील मुळचा शहापूर असलेला ओमकार तारमळे असे त्याचे नाव आहे. ओमकारच्या वडिलांनी पै पै गोळा करून त्याला क्रिकेटच्या मैदानात पाठवलं आहे. आज त्यांच्या या कष्टायची चीज झालं, कारण पोराची आयपीएलमध्ये निवड झाली आहे.
IPL 2026 News : आयपीएल 2026 चा ऑक्शन अबुधाबीमध्ये पार पडला आहे. या लिलावात नवखे खेळाडू भाव खाऊन गेले आहेत.कारण त्यांना त्यांच्या खेळाच्या जोरावर खूप चांगली बोली लागली आहे. असाच एक खेळाडू समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुळचा शहापूर असलेला ओमकार तारमळे असे त्याचे नाव आहे. ओमकारच्या वडिलांनी पै पै गोळा करून त्याला क्रिकेटच्या मैदानात पाठवलं आहे. आज त्यांच्या या कष्टायची चीज झालं, कारण पोराची आयपीएलमध्ये निवड झाली आहे. खूप संघर्षातून हा खेळाडू वर आला आहे. त्यामुळे क्रिकेच्या मैदानापर्यंतची त्याची नेमकी स्टोरी काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं कर मंगळवारी पार पडलेल्या लिलावात ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या ओमकार तारमळेची निवड झाली. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. या निवडीनंतर ओमकारच्या शेरे गावात तुफान जल्लोष करण्यात आला. या दरम्यान ओमकारच्या वडिलांनी अख्ख्या गावासमोर आपल्या मुलाला कसं क्रिकेटच्या मैदानात पोहोचवलं याचा संघर्ष सांगितला.
advertisement
आमचा ओमकार क्रिकेटच्या मैदानात दिवसेंदिवस प्रगती करत होता. तो आधी दिल्लीला गेला, मग महाराष्ट्रात खेळला.यानंतर माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण मला त्याला त्रिपूराला पाठवायचं होतं.त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.त्यावेळी मी माझ्या शेजारच्या महिलांच्या बचतगटाकून पैसे मागून 3 लाख रूपये जमा केले.आणि हे पैसे मी जमा करून त्याला त्रिपूराला पाठवलं. आणि तिकडे देखील ओमकारने खूप चांगला परफॉर्मन्स केला,असे ओमकारच्या वडिलांनी सांगितली.
advertisement
दरम्यान ओमकारची खेळी पाहून त्रिपुरातून मला फोन यायला लागले.ओमकार आमच्याकडे द्या, आम्ही ओमकारच सगळं बघतो.पण मी यास स्पष्ट नकार दिला. कारण आमच्या इथले कोच आहेत नरेश दिवाने, कल्याणचे काही कोच आहेत ते म्हणाले,ओमकारमध्ये अशी क्षमता आहे की तो भविष्यात तो काही तरी करून दाखवू शकतो,असे ओमकारच्या वडिलांनी सांगितली.
क्रिकेटसाठी त्यांनी पण खुप मेहनत केली.पहाटे 4 वाजता उठायचा, म्हणजे कधी उठायचा आणि कधी जायचा हे आम्हाला देखील माहिती नाही, असे ओमकारचे वडील म्हणाले. मी त्याला एकच गोष्ट सांगितलेली आयुष्यात चांगला फोकस ठेव.कारण माझ्या आयुष्यात मला जी मेहनत करावी लागली जी तुम्हाला करावी लागू नये.माझ्या मुलाच्या भबिष्यासाठी मी सगळे प्रयत्न केले.या प्रयत्नाचं यश त्याने मिळवून दिल,असे ओमकारचे वडील म्हणाले.
advertisement
दरम्यान माध्यमांशी बोलताना ओमकारच्या डोळ्यात अश्रू होते, आणि त्याने सांगितले, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मला क्रिकेट सोडायचे वाटे, पण मी ठरवले होते की काहीतरी करून दाखवणार आहे.
ओमकारची निवड 30 लाखांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात झाली आहे. आता ओमकार काव्या मारनच्या संघातून आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 9:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : बापाने पै पै गोळा केले, पोरानं कष्टाच चीज केलं, आयपीएलमध्ये नशीब चमकलं, काव्याच्या SRH मधून खेळणार









