advertisement

KL Rahul : 'गरज पडली तर सिनियर्सला...', कॅप्टन राहुलने मान्य केली चूक; साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या ODI सिरीजपूर्वी मोठं वक्तव्य

Last Updated:

KL Rahul Press Conference : टीम इंडियातील खेळाडू स्पिन बॉलिंग व्यवस्थित खेळू शकत नाहीत, असं स्पष्ट मत राहुलने भर पत्रकार परिषदेत यावेळी व्यक्त केलं.

News18
News18
KL Rahul on India Struggles with Spinners : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात वनडे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. अशातच आता साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने पत्रकार परिषदेत एक मोठी समस्या जाहीर केली. संघातील खेळाडू स्पिन बॉलिंग व्यवस्थित खेळू शकत नाहीत, असं स्पष्ट मत राहुलने यावेळी व्यक्त केलं. राहुलने कबूल केलं की, ही समस्या काही एका रात्रीत दूर होणार नाही, पण संघ यावर नक्कीच काम करत आहे. तसेच सिनियर खेळाडूंची मदत घेतली जाईल, असं म्हणत केएल राहुलने मोठं वक्तव्य केलं आहे.

आम्ही मान्य करतो की... - केएल राहुल

या गंभीर विषयावर बोलताना त्याने सांगितले की, मी तुम्हाला नक्की काही सांगू शकत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, आम्ही स्पिनर्सना व्यवस्थित खेळू शकत नाही आहोत. ही आमच्या गेमचा एक भाग आहे आणि आम्ही फिरकी गोलंदाजीविरुद्ध चांगला खेळ करत नाही आहोत, हे आम्ही मान्य करतो, असं केएल राहुल म्हणाला.
advertisement

सुनील गावस्करांचा सल्ला घेणार - केएल राहुल

केएल राहुलने महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर सरांचा उल्लेख करत सांगितलं की, त्यांच्याशी या संदर्भात बोलून नेमकं काय सुधारणा करायचे आहेत, हे समजून घेतले जाईल. संघ आधीपासूनच सुधारणा करण्याचे मार्ग शोधत आहे, पण हे रातोरात होणार नाही, असं केएल राहुल याने म्हटलं आहे.
advertisement

सिनियर्स खेळाडूंकडून शिकून घेऊ - केएल राहुल

दरम्यान, पुढे बोलताना केएल राहुल म्हणाला की, स्पिनच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी तांत्रिक बदल काय करायचे, याचे उत्तर प्रत्येक खेळाडू वैयक्तिक पातळीवर शोधत आहे आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आधी स्पिन खूप चांगल्या पद्धतीने खेळायचो. त्यामुळे, आम्ही सिनियर्स खेळाडूंकडून आणि अशा लोकांशी संपर्क साधून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे या समस्यांवर मात करण्यास मदत करतील, असंही केएल राहुल यावेळी म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KL Rahul : 'गरज पडली तर सिनियर्सला...', कॅप्टन राहुलने मान्य केली चूक; साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या ODI सिरीजपूर्वी मोठं वक्तव्य
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement