advertisement

KL Rahul : कुणाचच लक्ष नव्हतं पण संजूने पाहिलं अन् दिली 'जादू की झप्पी', केएल राहुलने मनं जिंकली राव..! पाहा Video

Last Updated:

KL Rahul Viral Video in Naman Awards : टीम इंडियाच्या मेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघाला मंचावर बोलवण्यात आलं. या कार्यक्रमावेळी हर्षा भोगले समालोचन करत होते.

KL Rahul Viral Video in Naman Awards
KL Rahul Viral Video in Naman Awards
BCCI Naman Awards 2026 : राजधानी दिल्लीत रविवारी रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी खेळाडूंचा 'बीसीसीआई नमन पुरस्कार 2026' देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात टीम इंडियाच्या वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूंचं कौतुक करण्यात आलं. मेन्स टी-ट्वेंटी टीम, वुमेन्स वनडे वर्ल्ड कप चॅम्पियन टीम, अंडर 19 मेन्स चॅम्पियन टीम आणि वुमेन्स अंडर 19 टीमला सत्कार यावेळी करण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील चॅम्पियन टीमला या खास कामगिरीसाठी विशेष सन्मानित करण्यात आलं. यावेळी केएल राहुलने असं काही केलं की, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

केएल राहुलची कॉपी केली

ज्यावेळी अवॉर्ड फंक्शन सुरू होतं. त्यावेळी टीम इंडियाच्या मेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघाला मंचावर बोलवण्यात आलं. या कार्यक्रमावेळी हर्षा भोगले समालोचन करत होते. त्यावेळी टीम इंडियाचे खेळाडू उठले अन् मंचाकडे जाऊ लागले. त्यावेळी केएल राहुलने पुढाकार घेतला अन् त्याने उठून खेळाडूसांठी टाळ्या वाजवल्या. केएल राहुलला पाहून इतरांनी देखील उठून केएल राहुलची कॉपी केली. कुणाच्याच लक्षात ही गोष्ट आली नाही पण संजूने केएल राहुलची गोष्ट नोटीस केली.
advertisement
advertisement

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

केएल राहुलचा आवाज ऐकताच संजू वळाला अन् त्याला केएल राहुल टाळ्या वाजवत असल्याचं दिसला. संजूने स्टेजच्या दिशेने न जाता तो केएल राहुलकडे वळाला अन् केएल राहुलला मिठी मारली. त्यावेळी दोघांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. दोघांच्या स्नेहभाव पाहून सर्वांच्या भूवया देखील उंचावल्या पण केएल राहुलचं कृती पाहून अनेकांनी त्याचं देखील कौतुक केलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
advertisement

आयुष म्हात्रे अन् हर्ष दुबेचा सत्कार

दरम्यान, 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देणाऱ्या मुंबईच्या आयुष म्हात्रेला स्थानिक मर्यादित ओव्हरच्या स्पर्धेत सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू म्हणून लाला अमरनाथ पुरस्कार देण्यात येईल. दरम्यान, 2024-25 रणजी ट्रॉफी हंगामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विदर्भाच्या हर्ष दुबेला सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. तर बीसीसीआयने माजी भारतीय खेळाडू रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KL Rahul : कुणाचच लक्ष नव्हतं पण संजूने पाहिलं अन् दिली 'जादू की झप्पी', केएल राहुलने मनं जिंकली राव..! पाहा Video
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement