IPL 2026 पूर्वी शाहरुख खानचा मोठा डाव! थेट रोहित शर्माच्या खास मित्राला केलं KKR चा हेड कोच
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Abhishek Nayar New Head coach of KKR : रोहित शर्माला पर्सनल कोचिंग देणाऱ्या अभिषेक नायरला केकेआरने हेट कोचपदी नियुक्ती दिल्याची माहिती समोर आलीये.
IPL 2026, Kolkata Knight Riders : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखील केकेआरने आयपीएल जिंकल्यानंतर मागील हंगामात केकेआरला चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच आता मालक शाहरूख खानने मोठा निर्णय घेतला आहे. शाहरूखने रोहितच्या मित्राला केकेआरचा हेड कोच केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2026 साठी अभिषेक नायर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करणार आहे.
अभिषेक शर्माला केकेआरमध्ये प्रमोशन
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, नायर यांना गेल्या आठवड्यात फ्रँचायझीच्या निर्णयाची माहिती देण्यात आली होती आणि लवकरच याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. नायर गेल्या वर्षी देखील केकेआर संघाचा भाग होता, जिथं त्याने सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून काम केलं होतं. अशातच आता त्याला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
कोचिंग सेटअपचा भाग
अभिषेक नायर केकेआर टीमच्या कोचिंग सेटअपचा भाग होता. तो युवा खेळाडूंचे मार्गदर्शन आणि विकास करण्यासाठी ओळखला जातो. रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर आणि अंगक्रिश रघुवंशी यांसारख्या भारतीय युवा खेळाडूंना घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी अभिषेकने मोठं काम केलं होतं.
advertisement
टीम इंडियाचा असिस्टंट कोच
जुलै 2024 मध्ये अभिषेकची भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे असिस्टंट कोच म्हणून निवड झाली. श्रीलंका दौऱ्यातून त्याने टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाने मोठे बदल केले. त्यात अभिषेकला काढून टाकण्यात आलं होतं.
हेड कोच म्हणून जबाबदारी
advertisement
टीम इंडियाचा असिस्टंट कोच म्हणून त्यांचा कार्यकाळ फार काळ टिकला नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टेस्ट फॉर्मेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर, एप्रिल 2025 मध्ये त्यांना भारतीय टीमच्या कोचिंग स्टाफमधून मुक्त करण्यात आले. मात्र, टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर लगेचच आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी त्यांनी पुन्हा केकेआरच्या सपोर्ट स्टाफमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता त्याला हेड कोच म्हणून जबाबदारी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 12:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 पूर्वी शाहरुख खानचा मोठा डाव! थेट रोहित शर्माच्या खास मित्राला केलं KKR चा हेड कोच


