KKR vs DC मॅचनंतर मोठा राडा! कुलदीप यादवने रागाच्या भरात Rinku Singh च्या कानशि‍लात लगावली, पाहा Video

Last Updated:

Kuldeep Yadav Slaps Rinku Singh : दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर कुलदीप यादवने रिंकु सिंगच्या कानशि‍लात लगावल्याचं समोर आलंय.

Kuldeep Yadav Rinku Singh Viral Video
Kuldeep Yadav Rinku Singh Viral Video
Kuldeep Yadav Rinku Singh Viral Video : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर आता प्लेऑफची चुरस वाढली आहे. अशातच आयपीएल 2025 च्या या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंगला दोन वेळा कानशिलात मारताना दिसत आहे. दोन्ही खेळाडूमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळतंय. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

कुलदीपने रिंकूच्या कानशि‍लात लगावली

समोर आलेल्या व्हिडीओनुसार, केकेआरने दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय मिळवल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर एकमेकांशी बोलत होते. संघाचे सर्व खेळाडू चर्चा करत असताना रिंकु सिंग आणि कुलदीप यादव यांच्यात हसत चर्चा सुरू होती. त्यावेळी अचानक कुलदीपने रिंकूच्या कानशि‍लात लगावली. त्यानंतर रिंकीचं तोंड पडल्याचं दिसून आलं. याच दरम्यान, व्हिडिओमध्ये कुलदीप यादव रिंकू सिंगच्या चेहऱ्यावर दोन वेळा थप्पड मारताना दिसत आहे.
advertisement
advertisement

रिंकु सिंग चिडला अन्...

रिंकू सिंग दुसऱ्या कानशिलात मारल्यानंतर स्पष्टपणे अस्वस्थ अवस्थेत दिसत होता. रिंकु सिंग कुलदीपच्या कृतीवर रागावलेला दिसत होता आणि त्याने कुलदीपशी काहीतरी बोलला. त्यानंतर देखील कुलदीपने आणखी एक थप्पड रिंकु सिंगला मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. दोघांमध्ये नेमकं काय संभाषण झालं? यावर अद्याप अधिकृत माहिती आली नाही. पण हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs DC मॅचनंतर मोठा राडा! कुलदीप यादवने रागाच्या भरात Rinku Singh च्या कानशि‍लात लगावली, पाहा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement