आला रे...मुंबईत मेस्सीची ग्रँड एंन्ट्री होणार, वाहतुकीत मोठे बदल होणार? वाचा पोलिसांच्या सूचना

Last Updated:

उद्या रविवारी लिओनेल मेस्सी मुंबईत येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीत काहीसा बदल असणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुक पोलिसांनी प्रवाशांना काय सूचना दिल्या आहेत? हे जाणून घेऊयात.

lionel messi visit Mumbai
lionel messi visit Mumbai
Lionel Messi Mumbai : अर्जंटीनाचा दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. मेस्सीच्या या भारत दौऱ्यात तो कोलकत्ता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरात जाणार आहे. आज सकाळी तो कोलकत्यात दाखल झाला होता,त्यानंतर आता संध्याकाळी तौ हैदराबादमध्ये आहे.त्यानंतर उद्या रविवारी लिओनेल मेस्सी मुंबईत येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीत काहीसा बदल असणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुक पोलिसांनी प्रवाशांना काय सूचना दिल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
लिओनेल मेस्सी मुंबईत आल्यावर वानखेडे स्टेडिअम आणि ब्रेबॉन स्टेडिअमवर जाणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सूरूवात होणार आहे. त्यामुळे मुंबईत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीमुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई पोलिसांनी प्रवाशांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. या सुचनांनचे पालन करण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
advertisement

गाड्या कुठे पार्क करता येणार?

स्टेडियमवर पार्किंगला परवानगी नाही आहे. सी,डी,ई,एफ,जी रस्ते, नरीमन रोड, दिन वाच्छा रोड,जमशेदजी टाटा रोड आणि एन.एस. रोडवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
एकमार्गी वाहतूक : डी रोड (पश्चिम-पूर्व),ई रोड (दक्षिण दिशेने), वीर नरीमन रोडला प्रवेश मर्यादित.
रस्ते बंद : कोस्टल रोड (मरीन ड्राईव्ह वरळी/तारदेव आणि चंद्र बोस रोड (प्रमुख चौकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
advertisement
पे अँड पार्क : चर्चगेट, एचटी पारेख मार्ग, दोराबजी टाटा रोड, जमनालाल बजाज मार्ग,विधानभवनाजवळ मर्यादित जागा उपलब्ध
कसा आहे मुंबईता कार्यक्रम?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो लियोनल मेस्सी उद्या 14 डिसेंबरला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतल्या सीसीआयमधील पॅडल कप स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर 4 वाजता मेस्सी सेलिब्रिटी फुटबॉल सामना खेळणार असून 5 वाजेच्या सुमारास वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रम आणि चॅरिटी फॅशन शो कार्यक्रमात मेस्सीचा सहभाग असणार आहे. दरम्यान, 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट आणि चर्चा होईल. दुपारी दीड वाजता अरुण जेटली स्टेडियम मधील कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आला रे...मुंबईत मेस्सीची ग्रँड एंन्ट्री होणार, वाहतुकीत मोठे बदल होणार? वाचा पोलिसांच्या सूचना
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement