VIDEO : वाह रे पठ्ठ्या! कुस्ती जिंकला पण माज नाही केला, जिंकल्यानंतरही प्रतिस्पर्ध्यासमोर झुकला, आखाड्यात काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या लढतीत कुस्ती जिंकल्यानंतर खेळाडूने माज केला नाही. उलट जिंकल्यानंतर कुस्तीपटूने आपल्या संस्काराचे दर्शन घडवले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Balu Bodke touch Feet Mauli Jamdade : पुण्याच्या वाघोलीत रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत आज फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे.त्यामुळे महाराष्ट्र केसरीची गदा कोण उचलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान या लढतीआधी एका लढतीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. कारण या लढतीत कुस्ती जिंकल्यानंतर खेळाडूने माज केला नाही. उलट जिंकल्यानंतर कुस्तीपटूने आपल्या संस्काराचे दर्शन घडवले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र केसरीच्या माती विभागात एक धक्कादायक निकाल लागला होता. उंचीने लहान असणाऱ्या पण चित्यासारख्या चपळ असणाऱ्या नाशिकच्या बाळू बोडके याने महान भारत केसरी किताब पटकावणाऱ्या अनुभवी मल्ल माऊली जमदाडे यांचा पराभव केला होता. माऊलीची उंच शरीरयष्टी, भारदस्त बॉडी, आणि पाठीशी असलेला मोठा अनुभव पाहता तो चिटकीसरशी बाळु बोडकेला चिरडुन टाकेल असे सर्वांनाच वाटलं होतं. पण निकाल भलताच लागला.
advertisement
बाळू बोडकेने चपळता दाखवत भारदस्त माऊली जमदाडेचा 10-5 ने पराभव केला होता. भारत केसरी किताब पटकावणाऱ्या इतक्या मोठ्या मल्लाचा पराभव केल्यानंतर बाळु बोडकेने माज दाखवला नाही, तो शांत राहिला त्याने मैदानात जल्लोषही केला नाही. याउलट आपल्या मातीतल्या संस्काराचे दर्शन घडवत तो पराभूत झालेल्या माऊली जमदाडेसमोर झुकला आणि त्याच्या पाया पडला.त्यामुळे विजयानंतरही बाळु बोडकेने केलेली ही कृती सर्वांची मन जिंकून गेली. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
advertisement
advertisement
माऊली जमदाने याने 10 पेक्षा जास्त राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्यासोबत अनेक मोठ्या कु्स्तींचा विजेता असून महाराष्ट्रातील टॉप मल्लांपैकी त्यांची गणना होता.कोल्हापूर गंगावेश तालमीमध्येच माऊली कुस्तीचा सराव करतो. माऊलीने नाव कमावलं आहे, परण त्याला महाराष्ट्र केसरीची गदा अद्याप मिळवता आलेली नाही आहे.
विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात होणार आहे. विजेत्या पैलवानाला विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. यात कुस्ती क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान असलेली मानाची गदा विजेत्या मल्लाला दिली जाणार आहे. यावेळचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.त्यामुळे अंतिम सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळायला मिळू शकते.या बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा दिली जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 3:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : वाह रे पठ्ठ्या! कुस्ती जिंकला पण माज नाही केला, जिंकल्यानंतरही प्रतिस्पर्ध्यासमोर झुकला, आखाड्यात काय घडलं?










