advertisement

नवा फोन खरेदी केलाय? सावधान, तुमच्यासोबतही होऊ शकतो हा फ्रॉड, पाहा कसा 

Last Updated:

Cyber Fraud: ऑनलाइन फसवणूक करणारे हे विविध आपल्याला फसवण्याचे विविध मार्ग शोधत असतात. आता तर त्यांनी नवा मार्ग शोधलाय. नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना स्कॅमर्सने निशाण्यावर धरलंय.

न्यू स्मार्टफोन फ्रॉड
न्यू स्मार्टफोन फ्रॉड
मुंबई : सध्या स्मार्टफोन खरेदी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. कारण वापरणारेही तेवढ्या प्रमाणात वाढत आहेत. एवढंच नाही तर स्मार्टफोन खरेदी करणंही अगदी सोपं झालंय. पण धोका हा प्रचंड वाढलाय. आता तर स्कमर्सनेही नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. कारण आता स्कॅमर्स हे कस्टमर केयर किंवा सर्व्हिस एजेंट असल्याचे सांगून नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना कॉल करुन फसवत आहेत. म्हणूनच एका लहानशा चुकीमुळे तुम्ही धोक्यात येऊ शकता.
हे नवं स्कॅम कसं काम करतं?
स्कॅमर्स खुप हुशारने हा स्कॅम करतात. तुम्ही नवा फोन खरेदी करताच तुम्हाला एक कॉल येतो. कॉल करणारा हा स्वतःला मोबाईल कंपनीचा किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगतो. तो म्हणता की, तुमच्या फोनचे व्हेरिफिकेशन किंवा अ‍ॅक्टिव्हेशन करणं हे गरजेचं आहे. तुम्ही अस केलं नाही तर डिव्हाइस ब्लॉक होऊ शकतो.
advertisement
यानंतर तो बनावट अधिकारी तु्म्हाला फोनमध्ये एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगतो. तसंच एखादा कोड शेअर करायला लावतो. तुम्ही हे केल्यास, स्कॅमरला तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस मिळतो. अनेक प्रकरणांमध्ये फोन पूर्णपणे लॉक होतो. ज्यामुळे तुमच्या फोनमधील पूर्ण डेटा चोरीला जातो.
advertisement
नुकसान कसं होतं?
अशा प्रकारच्या स्कॅम्समध्ये अडकल्यामुळे फक्त तुमचा फोन नाही तर पर्सनल माहितीही धोक्यात येते. बँक डिटेल्स, पासवर्ड, फोटो आणि गरजेचे डॉक्यूमेंट्स स्कॅमर्सच्या हाती लागू शकतात. अनेकदा तुमच्या फोनचा वापर दुसऱ्यांची फसवणूक करण्यासाठीही केला जाऊ शकतो.
कॉल खरा आहे की बनावट, या संकेंतावरुनही कळेल 
तुम्हाला अचानक एखादा कॉल आला आणि त्यांनी तुम्हाला लगेच ओटीपी विचारला किंवा अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितलं. तर सावध व्हायला हवं. खऱ्या कंपन्या कधीच फोनवर अशी माहिती मागत नाहीत. घाईघाईत निर्णय घेण्याचा दबाव टाकणे ही स्कॅमर्सची चाल असते. ज्यामुळे तुम्ही यात अजिबात अडकू नका.
advertisement
स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं?
  • अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सावध राहा.
  • कोणत्याही अनोळखी नंबरवर विश्वास ठेवू नका.
  • विचार न करता कोणतंही अ‍ॅप इंस्टॉल करू नका.
  • फोनमध्ये मजबूत पासवर्ड ठेवा.
  • वेळोवेळी सॉफ्टवेयर अपडेट करत राहा.
  • एखादा कॉल संशयास्पद वाटल्यास लगेच कट करा.
  • गरज पडल्यास स्वतः संबंधित कंपनीशी संपर्क करा.
advertisement
सुरक्षित कसं राहायचं?
नवीन टेक्नॉलॉजी आपलं आयुष्य सोपं बनवतेय. तसंच सायबर फसवणूक करणारेही नवनवीन पद्धती शोधत आहेत. यामुळे तुम्ही जागृक राहणं खुप गरजेचं आहे. कधीच अनोळखी कॉल किंवा मेसेजवर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका. थोडं अलर्ट राहिलात तर तुमचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
नवा फोन खरेदी केलाय? सावधान, तुमच्यासोबतही होऊ शकतो हा फ्रॉड, पाहा कसा 
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement