IPL 2026 आधी महेंद्रसिंग धोनीला आली नोटीस, फक्त 15 दिवसांची मुदत; काय काय आहेत आरोप?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mahendra singh Dhoni Get Notice before IPL 2026 : इंडियन प्रिमियर लीगचा आगामी सिझन मार्चच्या एन्डमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच चेन्नईचा थाला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. धोनी आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर चेन्नईच्या सीईओ यांनी स्पष्ट केलं आहे की, धोनी यंदा आयपीएल खेळताना दिसेल. अशातच आता धोनीला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
धोनीला कुणी पाठवली नोटीस?
झारखंड स्टेट हाऊसिंग बोर्डाने धोनीला एक अधिकृत नोटीस बजावली असून, ही नोटीस रांचीमधील हरमू परिसरातील एका निवासी प्लॉटशी संबंधित आहे. H-10A क्रमांकाच्या या प्लॉटबाबत बोर्डाने गंभीर आक्षेप नोंदवले असून, नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. हाऊसिंग बोर्डाच्या आरोपांनुसार, संबंधित प्लॉट केवळ राहण्याच्या उद्देशाने देण्यात आला होता.
advertisement
धोनीने पॅथॉलॉजी लॅब चालवली?
मात्र, सध्या त्या ठिकाणी कथितरीत्या एक पॅथॉलॉजी लॅब चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. निवासी क्षेत्रात व्यावसायिक उपक्रम राबवणे हे वाटप नियमांच्या अटींचे थेट उल्लंघन असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. या प्रकरणी धोनीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
थाला धोनीला 15 दिवसांची मुदत
advertisement
बोर्डाने आपल्या नोटिशीमध्ये स्पष्ट केले आहे की, जर 15 दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर या प्लॉटचे वाटप रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते. हाऊसिंग बोर्ड सध्या अशा सर्व प्रकरणांची चौकशी करत आहे, जिथे निवासी जागांचा वापर कमर्शियल कामांसाठी केला जात आहे. नियमांचे उल्लंघन कोणासाठीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
advertisement
रांचीच्या रिंग रोडवर फार्महाऊस
दरम्यान, धोनी सध्या हरमू येथील या घरात राहत नसून, त्याने रांचीच्या रिंग रोडवर स्वतःचे मोठे फार्महाऊस बांधले आहे. तो जेव्हा रांचीमध्ये असतो, तेव्हा याच फार्महाऊसवर मुक्कामाला असतो. दरम्यान, एका सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी धोनीचे कौतुक करताना त्याला झारखंडचा अभिमान म्हटले होते, मात्र आता सरकारी बोर्डाच्या या कारवाईमुळे सर्वांच्या नजरा धोनीच्या उत्तराकडे लागल्या आहेत.
Location :
Ranchi,Jharkhand
First Published :
Feb 28, 2026 1:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 आधी महेंद्रसिंग धोनीला आली नोटीस, फक्त 15 दिवसांची मुदत; काय काय आहेत आरोप?







