MI vs PBKS Qualifier 2 : एलिमिनेटर सामन्यात गुजरातचा धुव्वा उडवला, क्वालिफायर 2 मध्ये मुंबई 'या' संघाशी भिडणार

Last Updated:

GT vs MI : मुल्लानपुरच्या मैदानात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा धुव्वा उडवला आहे. मुंबईने 20 धावांनी हा सामना जिंकला आहे.त्यामुळे आता मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 सामन्यात पोहोचली आहे.

Gujarat Titans, Mumbai Indians
Gujarat Titans, Mumbai Indians
GT vs MI : मुल्लानपुरच्या मैदानात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा धुव्वा उडवला आहे. मुंबईने 20 धावांनी हा सामना जिंकला आहे.त्यामुळे आता मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 सामन्यात पोहोचली आहे. आता क्वालिफायर सामन्यात मुंबईची लढत पंजाब किंग्जशी होणार आहे. हा सामना येत्या 1 जूनला रंगणार आहे. आणि या सामन्यातील विजेता आता फायनलमध्ये बंगळुरूशी भिडणार आहे.
खरं तर प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सूरूवात चांगली झाली होती. रोहित शर्माच्या 81 धावांच्या अर्धशतकीय आणि र जॉनी बेअरस्ट्रोने 47 धावा बळावर मुंबईने 5 विकेट गमावून 228 धावा ठोकल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात चांगली झाली नव्हती. कारण शुभमन गिल शून्य धावावर बाद झाला होता.त्याच्यानंतर साई सुदर्शन एकट्याने 80 धावांची झुंजार खेळी केली. त्याने गुजरातला विजयाच्या उंबरठ्यावरही आणून ठेवलं. त्याला वॉशिंग्टन सुंदरने देखील 48 धावांची चांगली साथ दिली. पण सुदर्शनची विकेट पडताच संपूर्ण मॅच फिरली. त्यानंतर रुदरफोर्ड, तेवतिया आणि शाहरूख खानने विजयासाठी प्रयत्न केले. पण ते देखील अपयशी ठरले.
advertisement
गुजरात 208 धावाच करू शकली आणि मुंबईने २० धावांनी हा सामना जिंकला.त्यामुळे आता मुंबई इंडियन्स क्वालिफायर 2 सामन्यात पोहोचली आहे. आता क्वालिफायर सामन्यात मुंबईची लढत पंजाब किंग्जशी होणार आहे. हा सामना येत्या 1 जूनला रंगणार आहे. आणि या सामन्यातील विजेता आता फायनलमध्ये बंगळुरूशी भिडणार आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन
advertisement
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, कुसल मेंडिस (विकेटकिपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs PBKS Qualifier 2 : एलिमिनेटर सामन्यात गुजरातचा धुव्वा उडवला, क्वालिफायर 2 मध्ये मुंबई 'या' संघाशी भिडणार
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement