IPL 2025 मधला नवा राडा! सीनियर हार्दिकला प्रिन्सने भावच नाही दिला, असा माज दाखवला की.... पांड्याचं चोख प्रत्युत्तर, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shubhman Gill Hardik Pandya Ego clash Video : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात दोन्ही संघाच्या कॅप्टन्समध्ये वाद उफाळून आला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mumbai Indians vs Gujarat Titans : आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यांच्यात टॉसवेळी एक विचित्र क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. शुक्रवारी झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात टॉस मुंबई इंडियन्सच्या बाजूने आला. नियमानुसार, टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराला प्रथम बोलून आपला फलंदाजी किंवा गोलंदाजीचा निर्णय जाहीर करावा लागतो. मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या या भूमिकेत होता. टॉस पडल्यानंतर शुभमन गिलने शांतपणे मागे सरकत हार्दिकला पुढे येण्यासाठी जागा दिली.
पण नेमकं याच क्षणी, हार्दिक पांड्याने शुभमन गिलकडे आपला हात पुढे करत हस्तांदोलनासाठी (हँडशेक) पुढाकार घेतला. परंतु, शुभमन गिलने हार्दिकच्या या कृतीकडे लक्ष दिलं नाही आणि तो माघारी फिरला. यामुळे हार्दिकचा हात हवेतच राहिला आणि तिथं एक अवघडल्यासारखा क्षण निर्माण झाला, जो मैदानावरील कॅमेऱ्यांनी टिपला. ज्यामुळे शुभमनला पांड्याच्या प्रॉब्लेम आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
advertisement
The ego clash between Hardik and Gill in eliminator pic.twitter.com/IlEdgDg3lY
— Bosminñæ (@bas_you_hi) May 30, 2025
Gill refused to shake hands with Hardik Pandya. pic.twitter.com/DNlwykaIWU
— ` (@Ro45Aryan) May 30, 2025
advertisement
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांना वाटले की, शुभमन गिलने जाणीवपूर्वक हार्दिकच्या हस्तांदोलनाकडे दुर्लक्ष केले. काही चाहत्यांनी याला दोन्ही कर्णधारांमधील इगो क्लॅश म्हटलं आहे. दोन्ही खेळाडू एकेकाळी मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळले आहेत आणि नंतर हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला. या पार्श्वभूमीवर, टॉसवेळी घडलेला हा प्रकार चाहत्यांसाठी चर्चेचा एक नवा विषय ठरला आहे. या घटनेवर दोन्ही कर्णधारांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 8:39 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 मधला नवा राडा! सीनियर हार्दिकला प्रिन्सने भावच नाही दिला, असा माज दाखवला की.... पांड्याचं चोख प्रत्युत्तर, पाहा Video