Team India : इज्जत काढली तरी स्टेजवर आला, नक्वी समोर भारतीय खेळाडूंनी काय केलं? मैदानातला न पाहिलेला Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली, यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख मोहसीन नक्वीला पुन्हा एकदा त्याची जागा दाखवून दिली.
दुबई : आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली, यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख मोहसीन नक्वीला पुन्हा एकदा त्याची जागा दाखवून दिली. मोहसीन नक्वीच्या हातून आम्ही ट्रॉफी स्वीकारणार नाही, असं भारतीय खेळाडूंनी स्पष्ट केलं होतं, पण तरीही मोहसीन नक्वी मीच ट्रॉफी देणार म्हणून अडून राहिला. एवढच नाही तर नक्वी पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनसाठीही व्यासपीठावर उपस्थित राहिला. भारतीय खेळाडूंनी नक्वीकडून ट्रॉफी आणि मेडल घ्यायला नकार दिला, त्यामुळे पोस्ट मॅच प्रेझेन्टेशन बराच काळ ठप्प झालं होतं.
टीम इंडियाला ट्रॉफी आणि मेडल निष्पक्ष अधिकाऱ्याकडून मिळावी, अशी मागणी बीसीसीआयने केली, पण नक्वीने याला नकार दिला. एवढच नाही तर नक्वी आशिया कपची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंचे मेडल घेऊन स्टेडियममधून निघून गेला. पाकिस्तानी खेळाडूंना उपविजेतेपदाचं मेडल देण्यात आलं तेव्हा नक्वी व्यासपीठावर उपस्थित होता. पाकिस्तानी खेळाडूंना जेव्हा मेडल दिलं जात होतं, तेव्हा भारतीय खेळाडू व्यासपीठाच्या जवळच मैदानात बसले होते. यातले काही खेळाडू तर मोबाईल बघत होते, तर काही जण मैदानातच लोळत पडले होते.
advertisement
advertisement
भारताकडून तिलक वर्मा, कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांना पुरस्कार देण्यात आले, तेव्हाही मोहसीन नक्वी स्टेजवर उपस्थित होता, पण भारतीय खेळाडूंनी त्याच्याकडे बघितलंही नाही. भारतीय खेळाडूंनी नक्वीला त्याची जागा दाखवून दिली, त्याचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नक्वीच्या या वर्तनाबद्दल प्रतिक्रिया दिली. 'मी क्रिकेट खेळायला आणि पाहायाल सुरूवात केली, तेव्हापासून, ही गोष्ट मी कधीच बघितली नाही. एका चॅम्पियन टीमला ट्रॉफीपासून वंचित ठेवलं गेलं. आमचा तो हक्क होता, यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. माझ्या सगळ्या ट्रॉफी ड्रेसिंग रूममध्ये आहेत. माझ्यासोबत सगळे 14 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ, हे सगळे खरी ट्रॉफी आहेत', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
मोहसीन नक्वीच्या या भूमिकेविरोधात बीसीसीआयने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय पीसीबीच्या विरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल करणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 5:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : इज्जत काढली तरी स्टेजवर आला, नक्वी समोर भारतीय खेळाडूंनी काय केलं? मैदानातला न पाहिलेला Video