Maharashtra Flood Relief : मराठवाड्यात तुफान पाऊस, महापुराने होत्याचं नव्हतं,सिद्धिविनायक मंदिराने तिजोरी उघडली, घसघशीत मदत

Last Updated:

पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सूरू झाला आहे. आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पूरग्रस्तांना 10 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे.

maharashtra flood relief
maharashtra flood relief
Maharashtra Flood Relief : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांचे नुकसान झालेच आहे त्यासोबत काहींची जमीनही खरडून गेली आहे.घरांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे आता पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सूरू झाला आहे. आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पूरग्रस्तांना 10 कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही मदत सुपूर्द करण्यात आली आहे, मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील मराठवाड्यात मोठा पुर आला होता. या पूरात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांवर आलेल्या या अशा कठीण प्रसंगी सरकार त्यांना मदत देण्यासाठूी प्रयत्न करत आहेत. तसचे पुरग्रस्तांना या कठीण प्रसंगातातून बाहेर काढण्यासाठी आता श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1O कोटीची मदत देण्यात आली आहे,अशी माहिती पवन त्रिपाठी यांनी दिली आहे.
advertisement
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 1 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच मंदिर समितीने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडू प्रसाद आणि फुड पॅकेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत महिलांसाठी रुक्मिणी मातेची महावस्त्रेही दिली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली होती.तसेच श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव' यांच्यावतीने 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी 1 कोटी 11 लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
advertisement
मुंबईतला मानाचा समजला जाणारा लालबागचा राजा मंडळाने देखील पुरग्रस्तांना मदत जाहीर केली होती.लालबागच्या राजा मंडळाने पुरग्रस्तांसाठी 50 लाखाची मदत दिली गेली आहे.
पावसाचा धोका कायम
दरम्यान जरी मराठवाड्यातील नागरीक पुरातून सावरण्याचा प्रयत्न करत असले तरी पावसाचा धोका कायम आहे.कारण भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोका असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने सांगितले आहे.
advertisement
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Flood Relief : मराठवाड्यात तुफान पाऊस, महापुराने होत्याचं नव्हतं,सिद्धिविनायक मंदिराने तिजोरी उघडली, घसघशीत मदत
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement