Dombivali News : सुट्टीत मावशीकडे राहायला गेली अन् काळ आला,झोपेतच चिमुकलीसोबत भयंकर घडलं

Last Updated:

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मावशीकडे राहायला गेलेल्या एका चिमुकलीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घडना घडली आहे.

Dombivali News
Dombivali News
Dombivali Girl Death :   प्रदिप भांगे, प्रतिनिधी, डोंबिवली: डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मावशीकडे राहायला गेलेल्या एका चिमुकलीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. साप चावल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्राणगी विकी भोईर (वय 4)असे या मृत मुलीचे नाव आहे.तिच्यासोबत मावशीचाही सापाने चावा घेतला होता. त्यामुळे मावशीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सूरू आहेत.डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात मावशीकडे राहण्यास गेलेल्या प्राणगी भोईर या चार वर्षाच्या चिमुकलीचा साप चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.प्राणगी भोईर ही आजदे गावातील भागीरथी अपार्टमेंटमध्ये राहत होती. शनिवार/रविवार सुट्टी असल्याने नर्सरीत शिकणारी प्राणगी ही खंबाळपाड्यात राहणारी तिची मावशी बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर (२३) हिच्याकडे राहण्यास गेली होती.
प्राणगी ही तिची मावशी बबली उर्फ श्रुती जवळ झोपली होती. गाढ झोपेत असताना सापाने प्राणगीला चावा घेतला. त्यानंतर सापाने तिची मावशी बबली उर्फ श्रुती हिला देखील चावा घेतला. विष भिनलेल्या प्राणगीचा दवाखान्यात नेण्यापूर्वी मृत्यू झाला होता. तर मावशी बबली उर्फ श्रुती हिला आधी केडीएमसीच्या पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तिला ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगण्यात आले होते. तिथ सध्या मावशी बबली उर्फ श्रुतीवर अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
advertisement
दरम्यान या घटनेनंतर श्रूती यांच्या परिवारामधील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य तो उपचार दिला गेला नाही.ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यायला
अॅम्ब्युलन्स देखील उपलब्ध करून दिल नाही, असा आरोप मुलीचे काका आणि आजोबाने केले होते. पण सदर आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य ते उपचार दिले असून ठाण्याच्या रुग्णालयात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स सुद्धा दिली होती,असे डॉ. योगेश चौधरी यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivali News : सुट्टीत मावशीकडे राहायला गेली अन् काळ आला,झोपेतच चिमुकलीसोबत भयंकर घडलं
Next Article
advertisement
चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं कारण काय?
चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं का
  • चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं का

  • चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं का

  • चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं का

View All
advertisement