MS Dhoni : 'कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल...', धोनीचं कौतुक, गंभीरचाही रिप्लाय आला;वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाने वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरताच एमएस धोनीने इस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये धोनीने गंभीरसाठी खास ओळी लिहल्या होत्या. या ओळी पाहून आता गंभीरने धोनीच्या पोस्टवर रिप्लाय दिला आहे.
Gautam Gambhir reply on MS dhoni Instagram Story : टीम इंडियाने रविवारी न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप 2026 वर नावं कोरलं होतं. टीम इंडियाच्या या विजयानंतर खेळाडूंनी मैदानात भन्नाट जल्लोष केला होता. कारण खेळाडू मैदानात नाचले होते फोटोसेशन पार पडलं होतं. टीम इंडियाच्या या विजयानंतर प्रत्येकाच्या व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर टीम इंडियाच्या विजयाचा फोटो आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने देखील यावेळी मैदानात उपस्थित होता. धोनीने भारताच्या या विजयानंतर इंन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती.या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीच कौतुक करताना एम एस धोनीने 'कोच साहेब,तुमच्या चेहऱ्यावरच हास्य खुप छान दिसतंय'अशी लाईन देखील लिहली होती. धोनीच्या याच स्टोरीवर आता टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने रिप्लाय दिला आहे. त्यामुळे गौतम गंभीर नेमका काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर टीम इंडियाने वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरताच एमएस धोनीने इस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तो लिहतो, अहमदाबादच्या मैदानावर इतिहास रचला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफना शुभेच्छा दिल्या होत्या. तसचे तुम्हाला खेळताना पाहण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे देखील धोनी म्हणाला होता.
advertisement
Look what all the World Cup win has given us. A heartwarming Thala x Gauti moment on Instagram. We have seen it all! 🥹😂 pic.twitter.com/CHlpgZBkkL
— Mama (@SriniMaama16) March 9, 2026
विशेष म्हणजे या पोस्टमध्ये धोनीने गौतम गंभीरसाठी देखील एक खास ओळ लिहली होती. कोच साहब तुमच्या चेहऱ्यावर हास्य खुप छान दिसतं आहे. गंभीरची मैदानातील जिंकण्याची इच्छाशक्ती आणि हे हास्य म्हणजे एक 'किलर कॉम्बो' असल्याचं धोनीने मिश्किलपणे म्हटलं आहे.त्यामुळे धोनीच्या या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
advertisement
गंभीरने काय रिप्लाय दिला
धोनीच्या या पोस्टवर आता गौतम गंभीरने रिप्लाय दिला आहे. तुला पाहून छान हसण्याचे हे कारण आहे,असे उत्तर गंभीरने धोनीच्या स्टोरीवर दिले आहे.त्यामुळे गंभीरच्या या रिप्लायची चर्चा आहे.
खरं तर 2011 च्या वर्ल्ड कप फायनलपासून धोनी आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद निर्माण झाले होते. एक छक्केने वर्ल्ड कप नही जिताया, असं म्हणत गंभीर अजूनही धोनीला टोमणा मारतो. तसेच दोघांच्या पीआर टीम अनेकदा एकमेकांचे वाभाडे काढताना दिसते. अशातच धोनीने गंभीरमध्ये झालेला सोशल मीडियावर संवाद क्रिकेटप्रेमींना सुखावणारा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 6:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MS Dhoni : 'कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल...', धोनीचं कौतुक, गंभीरचाही रिप्लाय आला;वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत







