Ranji Trophy : रणजी 'किंग' मुंबईची सेमी फायनलमध्ये धडक, ठाकूर-कोटियनने खेचून आणला अशक्य विजय

Last Updated:

सर्वाधिक रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईने यंदाच्या मोसमातही रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने हरियाणाचा 152 रनने पराभव केला आहे.

रणजी 'किंग' मुंबईची सेमी फायनलमध्ये धडक, ठाकूर-कोटियनने खेचून आणला अशक्य विजय
रणजी 'किंग' मुंबईची सेमी फायनलमध्ये धडक, ठाकूर-कोटियनने खेचून आणला अशक्य विजय
कोलकाता : सर्वाधिक रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईने यंदाच्या मोसमातही रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने हरियाणाचा 152 रनने पराभव केला आहे. मुंबईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे. हरियाणाला शेवटच्या इनिंगमध्ये विजयासाठी 354 रनची आवश्यकता होती, पण त्यांचा 201 रनवर ऑलआऊट झाला. मुंबईकडून रॉयस्टन डायसने 5 तर शार्दुल ठाकूरने 3 आणि तनुष कोटियनने 2 विकेट घेतल्या.
हरियाणाकडून शेवटच्या इनिंगमध्ये ओपनर लक्ष्य दलालने 64 तर सुमित कुमारने 62 रनची खेळी केली. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईने 315 रन केले. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईची अवस्था 113-7 अशी झाली होती, पण नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या तुनष कोटियनने 97 रन तर सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शम्स मुलानीने 91 रन केले.
advertisement
मुंबईचा ऑलआऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या हरियाणाने 301 रन केले, ज्यामुळे मुंबईला पहिल्या इनिंगमध्ये 14 रनची आघाडी मिळाली. हरियाणाचा कर्णधार अंकित कुमारने 136 रन केले. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने 6 विकेट घेतल्या, तर शम्स मुलानी आणि तनुष कोटियनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. हरियाणाचा ऑलआऊट झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आलेल्या मुंबईने 339 रनचा मोठा स्कोअर उभारला. कर्णधार अजिंक्य रहाणेने खणखणीत शतक झळकावलं. रहाणेने 180 बॉलमध्ये 108 रन केले, यात 13 फोरचा समावेश होता. याशिवाय सूर्यकुमार यादवनेही 70 रनची महत्त्वाची खेळी केली.
advertisement
मॅचमध्ये 9 विकेट घेणाऱ्या शार्दुल ठाकूरला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं आहे. मुंबईची सेमी फायनल 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. क्वालिफायर 2 विरुद्ध क्वालिफायर 3 मधल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या टीमचा सेमी फायनलमध्ये मुंबईविरुद्ध सामना होईल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : रणजी 'किंग' मुंबईची सेमी फायनलमध्ये धडक, ठाकूर-कोटियनने खेचून आणला अशक्य विजय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement