IPL 2025 : पराभव मुंबई इंडियन्सचा पण धक्का मात्र RCB ला, गुजरात टायटन्सच्या विजयाने मोठा उलटफेर

Last Updated:

IPL 2025 : IPL 2025 स्पर्धेचा उत्तरार्ध आता सुरू झाला आहे. पण यंदाची गंमत म्हणजे 16 पॉइंट मिळून देखील RCB अद्याप प्लेऑफमध्ये पोहोचलेली नाही. यावरून यंदाची स्पर्धा ही किती अटीतटीची आहे हे आपल्या लक्षात येईल.

News18
News18
IPL 2025 : IPL 2025 स्पर्धेचा उत्तरार्ध आता सुरू झाला आहे. पण यंदाची गंमत म्हणजे 16 पॉइंट मिळून देखील RCB अद्याप प्लेऑफमध्ये पोहोचलेली नाही. यावरून यंदाची स्पर्धा ही किती अटीतटीची आहे हे आपल्या लक्षात येईल. याक्षणी टॉप 5 मधील जवळपास सर्वच टीम 16 धावांच्या पुढे जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात अव्वल स्थानी
मंगळवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात गुजरात टायटन्सने बाजी मारली. मुंबईच्या प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा 56 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामातील आठव्या विजयासह, गुजरातने 16 गुण आणि 0.793 च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मागे टाकले. दुसरीकडे, मुंबईने 12 पैकी सात सामने जिंकले आणि पाच सामने गमावले आणि चौथ्या स्थानावर पोहोचली.
advertisement
मुंबईच्या पराभवाचा आरसीबीला फटका
या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये उलटफेर झालेला पाहायला मिळाला. RCB ने सर्वात आधी १६ पॉईंट्स कमवत पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं होत. त्यांनी +0.482 नेट रन रेटसह पॉइंट्स टेबलमध्ये प्रथम क्रमांकावर स्थान मिळवलं होत. पण काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात +0.793 च्या नेट रन रेटसह अव्वल स्थान पटकावलं आहे. मुंबई विरुद्ध गुजरात या सामन्यात अनेक रोमांचपूर्ण क्षण पाहायला मिळाले पण मुंबई च्या पराभवाचा धक्का मात्र आरसीबीला बसलेला पाहायला मिळत आहे.
advertisement
पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात गुजरातने शेवटच्या षटकात शानदार विजय मिळवला. खरंतर, 18 व्या षटकानंतर पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला. त्यावेळी जेराल्ड कोएत्झी आणि राहुल तेवतिया प्रत्येकी 5 धावांसह क्रीजवर होते. गुजरातचा स्कोअर 132/6 होता. आता त्यांना जिंकण्यासाठी शेवटच्या दोन षटकांत 24 धावांची आवश्यकता होती. तथापि, पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि डीएलएस पद्धतीने त्यांना 19 षटकांत 147 धावांचे नवीन लक्ष्य देण्यात आले.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : पराभव मुंबई इंडियन्सचा पण धक्का मात्र RCB ला, गुजरात टायटन्सच्या विजयाने मोठा उलटफेर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement