वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला पीएम मोदींकडून लाडूसोबत खास सरप्राइज

Last Updated:

टीम इंडियाच्या महिला खेळाडूंना पीएम नरेंद्र मोदींनी भेटून शुभेच्छा दिल्या, दीप्ती शर्मा, स्मृती, शफाली वर्मा यांचे किस्से ऐकले, फिट इंडिया संदेश दिला, बुंदीचे लाडू व भेळ दिली.

News18
News18
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या महिला खेळाडूंना भेटून पीएम नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यांचे अनुभव, किस्से, गमतीजमती पीएम मोदींनी ऐकले. यावेळी बोलताना दीप्ती शर्माच्या हनुमानच्या टॅटूचं रहस्य जाणून घेतलं. पंतप्रधान मोदींनी वर्ल्ड कप प्लेअर ऑफ द टूर्नामेंट दीप्ती शर्मासाठी डीएसपी हा शब्द वापरला. स्मृतीने यावेळी तिला तीन मॅच पराभूत झाल्यानंतर कोणती प्रेरणा मिळाली ज्यामुळे वर्ल्ड कप जिंकायला मदत झाली ते सांगितलं.
टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी पीएम मोदींना चक्क त्यांची स्कीन ग्लो करत असून स्कीन केअर रुटीन विचारलं आहे. त्यावर पीएम मोदी यांनी जनतेचा आशीर्वाद असल्याचं स्पष्ट केलं. तर गप्पांनंतर पीएम मोदी यांनी सगळ्या टीम इंडियातील खेळाडूंसाठी खास ट्रिट दिली. त्यांनी सगळ्यांना बुंदीचे लाडू दिले. त्यावर स्मृती मानधनाने मी तर पहिल्यांदाच खातेय अशी प्रतिक्रिया पीएम नरेंद्र मोदींना दिली. त्याच वेळी त्यांनी स्मृतीला तुला आवडणारी भेळ आणली आहे.
advertisement
हे ऐकताच स्मृतीला आश्चर्य वाटलं आणि सुखद धक्काही बसला. स्मृतीला भेळ आवडते हे त्यांनी लक्षात ठेवून आठवणीने खास तिच्यासाठी खास भेळ मागवली होती. त्यानंतर टीम इंडियाला महिला खेळाडूंच्या आवडी निवडी जाणून घेतल्या. तेव्हा स्मृती म्हणाली की तुम्ही इतक्या सगळ्यांच्या आवडी निवडी कशा लक्षात ठेवात, मोदी म्हणाले मी वर्तमानात राहातो त्यामुळे लक्षात राहतात, आणि टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवणाचा आस्वाद घेतला.
advertisement
पंतप्रधानांनी खेळाडूंना देशभरात, विशेषतः मुलींमध्ये "फिट इंडिया" संदेश पसरवण्याचे आवाहन केले. त्यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आणि फिटनेस आणि शारीरिक हालचालींचे महत्त्व अधोरेखित केले.
त्यांनी खेळाडूंना त्यांच्या शाळांना भेट देण्यास आणि मुलांना खेळात रस घेण्यास प्रेरित करण्यास सांगितले. खेळाडू आता त्यांच्या गावी परततील. तथापि, शफाली वर्मा नागालँडला जाणार आहे, जिथे ती आगामी आंतर-झोनल टी-२० स्पर्धेत उत्तर विभागीय संघाचे नेतृत्व करेल.
advertisement
भारताचा विश्वचषक विजय देशातील महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला, ज्यामुळे अनेक वर्षांच्या कठोर परिश्रम आणि अपूर्ण स्वप्ने साकार झाली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने एका भक्कम दक्षिण आफ्रिकेला हरवून एकदिवसीय विजेतेपद जिंकणारा चौथा संघ बनला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृती मानधनाला पीएम मोदींकडून लाडूसोबत खास सरप्राइज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement