स्वस्त प्रवासाचं स्वप्न झालं टेंशनमध्ये, हाफ तिकिट घेतलेल्या महिलांना बसला मोठा धक्का

Last Updated:

Kalyan News तिकिटाचा फायदा घेण्यासाठी लाडक्या बहिणी हाफ तिकिटावर बसस्थानकावर गर्दी करीत होत्या. मात्र या गर्दीचा फटका महागात पडला. चोरांनी उल्हासनगर आणि कल्याण एसटी बसस्थानकावर महिलांचे दागिने चोरले जे पाहून लोकच हादरले.

महिलांची बसस्थानकावर गर्दी चोरट्यांनी घेतला फायदा
महिलांची बसस्थानकावर गर्दी चोरट्यांनी घेतला फायदा
लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी  बहुतांश महिला अनेक ठिकाणी गर्दी करतात याच गर्दीचा फायदा चोरटे आणि टवाळी लोक घेतात . राज्यसरकारने दिवाळीत महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत दिल्याने महिलांनी यांचा आतोनात फायदा घेतला. परंतु,  उल्हासनगर ,कल्याणमध्ये  महिलांना हा प्रवास भाडा महागात पडला.
हाफ तिकिट महिलांना पडले महागात, नेमकं घडलं काय?
पन्नास टक्के सवलतीसाठी एसटी बसस्थानकांवर महिलांची तुफान गर्दी होती. या सवलतीचा फायदा घेतलेल्या अनेक महिला प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी  केल्याने याचा भलताच फटका महिलांना बसला. विठ्ठलवाडी आणि कल्याण बसस्थानक परिसरात मंगळसूत्र, मोबाइल आणि रक्कम चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत गुन्हेही दाखल झाले. मात्र, आतापर्यंत एकही चोरटा हाती लागला नाही.
advertisement
दिवाळीत गर्दीचा फायदा उचलून सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या टोळ्यांनी राज्यातील विविध बसस्थानकांवर महिलांच्या मौल्यवान ऐवजावर हात साफ केला. महिलांची मंगळसूत्रे, दागिने, पर्स, रोकड, मोबाइल आदी ऐवजांवर हात साफ केल्याच्या घटना उघड झाल्याची कबुली पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षात राज्यातील विविध बसस्थानकांत 210 हून अधिक चोऱ्या झाल्याचे उघड झाले. त्यातील बहुतांश घटना गर्दीच्या वेळी घडल्या आहेत.
advertisement
महिलाना पूर्व सूचना देऊनही न ऐकल्याने या घटना वारंवार घडत असतात दिवाळी सारख्या मोठ्या सणात सर्वजण गावी जाण्याच्या नांदात असतात . महिलांनी भाडे सवलतीचा फायदा घेण्यासाठी बसस्थानकांवर गर्दी केली. याचाच फायदा चोरट्यांनी उचलल्याने, ऑक्टोबरमध्ये बस स्थानकांत गुन्ह्याच्या प्रमाणात वाढले.राज्यात महिलांसाठी 50 टक्के प्रवास भाड्यात सवलती दिल्याने, दिवाळीत एसटी बसस्थानकांवर महिला प्रवाशांची गर्दी होती. याचा फायदा चोरट्यांनी घेऊन हात सफाई केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
advertisement
महिला प्रवाशांनी बसचा प्रवास करताना अंगावर दागिने घालून प्रवास करणे टाळावे. दागिने सुरक्षित ठेवावेत. पर्स किंवा हँडबॅग नेहमी शरीरासमोर पकडून ठेवावी. बसमध्ये चढताना काळजी घ्यावी. असे महेश भोये व्यवस्थापक कल्याण बसस्थानक यांनी यावेळी सूचना दिली.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
स्वस्त प्रवासाचं स्वप्न झालं टेंशनमध्ये, हाफ तिकिट घेतलेल्या महिलांना बसला मोठा धक्का
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement