594 इंटरनॅशनल मॅच खेळलेला दिग्गज झाला राजस्थान रॉयल्सचा कोच, द्रविडची जागा घेणार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
राहुल द्रविडने अचानक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजस्थान रॉयल्सने नव्या प्रशिक्षकाची निवड केली आहे.
मुंबई : राहुल द्रविडने अचानक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजस्थान रॉयल्सने नव्या प्रशिक्षकाची निवड केली आहे. 404 वनडे, 134 टेस्ट आणि 56 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेल्या दिग्गज खेळाडूची राजस्थान रॉयल्सने प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.
संगकारा पुन्हा राजस्थानचा प्रशिक्षक
कुमार संगकारा याच्यावर राजस्थान रॉयल्सने प्रशिक्षक म्हणून विश्वास दाखवला आहे. 2021 पासून संगकारा राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक होता. तर राहुल द्रविडच्या आधी संगकाराने टीमचं मुख्य प्रशिक्षकपद भुषवलं होतं.
राहुल द्रविडने 2012 आणि 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं होतं. यानंतर 2014 आणि 2015 मध्ये द्रविड टीमचा मेंटॉर होता. 2024 मध्ये द्रविडने टीम इंडियाचं प्रशिक्षकपद सोडल्यानंतर लगेचच द्रविड पुन्हा एकदा राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक झाला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थानची कामगिरी निराशाजनक झाली. या मोसमात त्यांना 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकता आल्या, त्यामुळे द्रविडने राजस्थानची साथ सोडली.
advertisement
संगकाराचं प्रभावी रेकॉर्ड
संगकारा प्रशिक्षक असताना राजस्थान रॉयल्सची कामगिरी उल्लेखनीय झाली. संगकारा प्रशिक्षक असताना संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचली. तर 2022 साली टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळाला. यानंतर पुढच्या मोसमात राजस्थानचा क्वालिफायर-2 मध्ये पराभव झाला.
संजू राजस्थानसोबत राहणार?
संगकारासमोर संजू सॅमसनला राजस्थानसोबत कायम ठेवण्याचं आव्हान असेल, कारण संजूने टीमची साथ सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता संगकारा टीममध्ये आल्यामुळे संजू त्याचा निर्णय बदलणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
advertisement
संगकारासोबत कोचिंगमध्ये कोण असणार?
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार भारताचा माजी सहाय्यक प्रशिक्षक असलेला विक्रम राठोड तसंच बॉलिंग प्रशिक्षक शेन बॉन्डही टीमसोबत कायम असेल. बॉन्ड 2024 साली मुंबई इंडियन्समधून राजस्थानच्या टीममध्ये आला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 11:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
594 इंटरनॅशनल मॅच खेळलेला दिग्गज झाला राजस्थान रॉयल्सचा कोच, द्रविडची जागा घेणार