RCB vs MI : अखेरच्या ओव्हरचा थ्रिलर ड्रामा, 18 धावांची गरज अन् नदीन डी क्लार्कने कसा पलटला गेम? पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nadine de Klerk RCB vs MI WPL 2026 : आरसीबीला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज असताना मुंबईची अनुभवी नैट सायव्हर ब्रंट बॉलिंगसाठी आली. ओव्हरचे पहिले 2 बॉल्स डॉट गेल्याने मुंबईचा विजय निश्चित वाटत होता पण...
18 needed in the final over... आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातली मॅच रंगात आली. अखेरच्या ओव्हरमध्ये आरसीबीला जिंकायला 18 रन्सची गरज होती. स्मृती मानधनासोबत आरसीबीची बॅटिंग लाईनअप पत्त्यासारखी कोसळली. त्यावेळी आरसीबीच्या मदतीला धावली साऊथ अफ्रिकेची नदीन डी क्लार्क... नदीनने आक्रमक खेळी करत आरसीबीचा डाव सावरला. एकाकी डाव सावरत नदीनने 143.18 च्या स्ट्राईक रेटने 63 धावा कोरल्या. अखेरच्या बॉलवर विजयासाठी तीन धावांची गरज असताना नदीने खणखणीत शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरजफोर मारला अन् मॅच आरसीबीच्या पारड्यात झुकवली.
शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज
आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील या थरारक मॅचमध्ये नदीन डी क्लर्कने ऐतिहासिक कामगिरी केली. आरसीबीला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज असताना मुंबईची अनुभवी नैट सायव्हर ब्रंट बॉलिंगसाठी आली. ओव्हरचे पहिले 2 बॉल्स डॉट गेल्याने मुंबईचा विजय निश्चित वाटत होता, मात्र त्यानंतर डी क्लार्कने रुद्र अवतार धारण केला. तिने पुढच्या 4 बॉल्सवर 6, 4, 6, 4 अशा रन्सची बरसात करत आरसीबीला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
advertisement
18 needed off last 6 balls, Nat Sciver-Brunt bowling. Pressure? WHAT PRESSURE!!!!!!
Nadine de Klerk lit up the opening night of #TATAWPL 2026 & how!
Relive the opening day thriller https://t.co/Q2ZlYQUV2Q pic.twitter.com/WFWBeMN4Lg
— Star Sports (@StarSportsIndia) January 9, 2026
advertisement
'प्लेयर ऑफ द मॅच'
नादिन डी क्लार्कने या मॅचमध्ये केवळ बॅटिंगच नाही तर बॉलिंगमध्येही आपली छाप पाडली. तिने 44 बॉल्समध्ये नाबाद 63 रन्सची खेळी केली, ज्यात 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. त्याआधी बॉलिंग करताना तिने मुंबईच्या 4 विकेट्स देखील घेतल्या होत्या. तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव धक्कादायक ठरला असून कॅप्टन हरमनप्रीत कौरला आता पुढच्या मॅचसाठी रणनीतीत बदल करावा लागणार आहे.
advertisement
नदीन डी क्लार्कने चित्र पालटलं
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील या अटीतटीच्या लढतीत आरसीबीने 3 विकेट्स राखून विजय मिळवला. मुंबईची टीम ही मॅच सहज जिंकेल असे वाटत असतानाच नादिन डी क्लार्कने खेळाचे चित्र पालटले. आरसीबीला शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्सची गरज असताना डी क्लार्कने नैट सायव्हर ब्रंटच्या बॉलिंगवर 2 फोर आणि 2 सिक्स मारून अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. मुंबईच्या बॉलर्सना मोक्याच्या क्षणी आपली लय टिकवता आली नाही, ज्याचा फायदा आरसीबीला मिळाला.
advertisement
मुंबई इंडियन्स बॅटिंग अपयशी
या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या अनुभवी ऑलराउंडर खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र बॅटिंगमध्ये त्या अपयशी ठरल्या. नैट सायव्हर ब्रंट केवळ 4 रन्स करून बाद झाली आणि नंतर शेवटच्या ओव्हरमध्ये तिने खूप रन्स दिले. टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर देखील सेट झालेली असताना 20 रन्सवर आऊट झाली. कॅप्टन म्हणून शेवटच्या ओव्हर्समध्ये योग्य बॉलर निवडण्यात तिची चूक झाली, जी मुंबईला महाग पडली.
advertisement
पहिली मॅच देवाला...
अमेलिया केरने बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी, बॅटिंगमध्ये ती पूर्णपणे फ्लॉप ठरली. तिने 15 बॉल्समध्ये केवळ 4 रन्स केले, ज्यामुळे मुंबईचा रन रेट कमी झाला. मुंबईच्या या धिम्या बॅटिंगचा फटका त्यांना मॅचच्या निकालात बसला. पहिली मॅच देवाला ही मुंबई इंडियन्सची परंपरा आहे. हीच परंपरा आता हरमनप्रीत कौरने देखील कायम ठेवल्याचं पहायला मिळालंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 7:40 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB vs MI : अखेरच्या ओव्हरचा थ्रिलर ड्रामा, 18 धावांची गरज अन् नदीन डी क्लार्कने कसा पलटला गेम? पाहा Video










