Rohit Sharma VIDEO : 4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबई इंडियन्सचा सामना हा रविवारी कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध सामना खेळणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्मा मैदानात कसून सराव करतोय.या दरम्यान रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma News : उद्यापासून आयपीएल 2026 च्या हंगामाला सूरूवात होत आहे. या हंगामातला पहिला सामना हा रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. तर रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे.या सामन्याची क्रिकेट फॅन्सना प्रचंड उत्सुकता लागली आहे. ही उत्सुकता असतानाच रोहित शर्माचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा प्रचंड चिडलेला दिसतो आहे.त्यामुळे रोहित शर्माच नेमकं काय बिनसलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सराव करतो आहे. आयपीएल सूरू व्हायला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत तर मुंबई इंडियन्सचा सामना हा रविवारी कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध सामना खेळणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्मा मैदानात कसून सराव करतोय.या दरम्यान रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या कारमधून एका ठिकाणी आला आहे. हे ठिकाण नेमकं कोणतं आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे.पण रोहित शर्मा त्याच्या कारमधून उतरला आणि त्याने मागे जाऊन डीकी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र डिकी उघडत नसल्यानो तो रागावला आणि त्याने काचेवरच हात मारला. त्यानंतर तो कार मागून पुढे आला आणि तो ड्रायव्हरवर देखील चिडला होता. त्यामुळे डिकीवरून कदाचित रोहित शर्मा चिडल्याचे समजते आहे.
advertisement
Rohit Sharma wasn’t in a good mood, he tried opening the car trunk but it didn’t open. Frustrated, he hit the car and said,
"Aree Khula nhi, Khol yrr.. Kya kar Rahe Ho"
The angry mood of bRO pic.twitter.com/QVWAzmK9TN
— (@rushiii_12) March 27, 2026
advertisement
दरम्यान मागच्या हंगामात रोहित शर्मा हा अनफीट होता.त्यामुळे त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला खेळवले गेले होते. पण यावेळेस रोहितने आपले फिटनेस सिद्ध केली आहे, त्यामुळे तो कदाचित मैदानात पुर्णवेळ दिसण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा टीमला देखील फायदा होणार आहे. सामन्यातील निर्णायक क्षणी काय निर्णय घ्यायचे, याच सगळं मार्गदर्शन त्यांना रोहितकडून मिळणार आहे.त्यामुळे रोहित शर्माचा टीमला मोठा फायदा होणार आहे.
advertisement
दरम्यान मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2026 मधला पहिला सामना हा कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध रविवारी खेळवण्यात येणार आहे.या सामन्यात कोण विजयी ठरतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 5:34 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma VIDEO : 4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?








