IND VS AUS 2nd ODI : विराट कोहली 'आऊट ऑफ डेंजर' पण रोहित शर्मासमोर धोक्याची घंटा! हिटमॅनसाठी अखेरची संधी?

Last Updated:

Rohit sharma not safe in Adelaide : दुसऱ्या वनडे सामन्यात दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. विराट कोहलीला दुसऱ्या वनडेपूर्वी काहीही धोका नाहीये. पण रोहित शर्माला सावधान रहावं लागणार आहे.

Rohit sharma not safe in Adelaide
Rohit sharma not safe in Adelaide
India vs Australia 2nd ODI, Adelaide : सात महिन्यांच्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गजांनी पर्थ येथील पहिल्या मॅचमध्ये संघर्ष केला. रोहित केवळ 8 रन्सवर आऊट झाला, तर कोहली तर फक्त आठ बॉल खेळून डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे आता दुसरा वनडे सामना दोन्ही खेळाडूंसाठी करो या मरो असणार आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. विराट कोहलीला दुसऱ्या वनडेपूर्वी काहीही धोका नाहीये. पण रोहित शर्माला सावधान रहावं लागणार आहे.

विराटसाठी अॅडलेड सेफ

अॅडलेड ओव्हलच्या या मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने चार सामन्यांमध्ये 61 च्या प्रभावी सरासरीने 244 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आहेत. या मैदानावर कोहलीचा कसोटी विक्रम आणखी उल्लेखनीय आहे, पाच सामन्यांमध्ये 53.70 च्या सरासरीने 537 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतके आहेत. तर याच मैदानावर विराटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 12 मॅचमध्ये पाच शतकं आहेत. त्यामुळे विराटसाठी अॅडलेड सेफ गेम असणार आहे.
advertisement

रोहित शर्मासाठी धोक्याची घंटा

दुसरीकडे, रोहित शर्माचा ॲडलेड येथील रेकॉर्ड थोडा साधारण आहे. सहा वनडे मॅचमध्ये त्याने 21.83 च्या ॲव्हरेजने 131 रन्स केल्या आहेत आणि 43 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मात्र, रोहितच्या अनुभवामुळे आणि एकट्याच्या बळावर सामना जिंकून देण्याच्या क्षमतेमुळे टीम इंडियाच्या बॅटिंग लाईन-अपमध्ये तो महत्त्वाचा प्लेअर आहे. मात्र, रोहित शर्मा कधीही कुठंही आपला जलवा दाखवू शकतो. याची प्रचिती सर्वांनाच असेल. अशातच आता रोहित शर्माच्या कामगिरीवर देखील लक्ष असणार आहे.
advertisement

सुनील गावस्कर म्हणतात...

दरम्यान, भारत अजूनही खूप चांगला संघ आहे. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. रोहित आणि कोहली पुढील दोन सामन्यात मोठे धावा काढल्यास आश्चर्यचकित होऊ नका. ते जितके जास्त खेळतील, ते नेटमध्ये जितका जास्त वेळ घालवतील तितके जास्त थ्रोडाऊन त्यांना मिळतील, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS AUS 2nd ODI : विराट कोहली 'आऊट ऑफ डेंजर' पण रोहित शर्मासमोर धोक्याची घंटा! हिटमॅनसाठी अखेरची संधी?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement