VIDEO : रोहित शर्माचा PRANK करायला गेला, पुढे भलतंच घडलं, धवल कुलकर्णीचा झाला गेम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
येत्या 30 नोव्हेंबर 2025 पासून टीम इंडिया साऊथ आफ्रिकेविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा खेळताना दिसणार आहे.
Rohit sharma Prank Video : येत्या 30 नोव्हेंबर 2025 पासून टीम इंडिया साऊथ आफ्रिकेविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा खेळताना दिसणार आहे. पण या मालिकेआधी रोहित शर्मासोबत प्रॅक होता होता राहिला आहे. आता होता होता का राहिला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच्या जागी दुसऱ्याच खेळाडूचा प्रॅक होऊन बसला आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.या व्हिडिओत नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेनंतर रोहित शर्मा मुंबईत परतला तर उरलेला संघ हा ऑस्ट्रेलिया सोबत टी20 मालिका खेळतोय. ही मालिका येत्या शनिवारी संपूष्ठात येणार आहे.त्यानंतर संपूर्ण संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी खेळणार आहे. सूरूवातीला दक्षिण आफ्रिकेशी दोन टेस्ट सामने खेळवले जाणार आहे.त्यानंतर वनडे मालिका खेळवली जाणार आहे.त्यामुळे या काळात मोठा गॅप होता. या दरम्यान रोहित शर्मा बीसीसआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये प्रॅक्टीस करतोय.
advertisement
ROHIT SHARMA WITH SHOCK PEN. 😂🔥 pic.twitter.com/MoHZchOFbx
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2025
या दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रोहित शर्माजवळ येतो आणि त्याला ऑटोग्राफ देण्यास सांगतो. पण ऑटोग्राफसाठी घेऊन आलेला पेन पाहून रोहित शर्मा शातीर बनतो आणि म्हणतो या पेनने नाही तर या पेनमध्ये काय आहे? मला माहिती आहे.
advertisement
खरं तर रोहित शर्माला दिलेला पेन हा शॉक पेन आहे. हा पेन चालू करताच शॉक लागतो.त्यामुळे ही गोष्ट त्याला लगेच लक्षात येते. त्यानंतर त्याच्यावर आलेला प्रॅक तो लगेच दुसऱ्यावर करायला बघतो. यावेळी रोहित शर्मा एका व्यक्तीजवळ जातो आणि त्याला वहीवर साईन करायला सागतो आणि तो व्यक्ती पेन सूरू करायला जाताच त्याला शॉकचा मोठा झटका लागतो. त्यानंतर त्या व्यक्तीला देखील आपला प्रॅक झालेला कळतो आणि यावर रोहित शर्मा जोरजोरात हसतो.
advertisement
रोहित शर्मा यावरच थांबत नाही तर एका व्यक्तीला तो पेन धवन कुलकर्णीला घ्यायला सांगतो. धवन कुलकर्णी तो पेन घेऊन चालु करायला जाताच त्याला दोनदा शॉक लागतो. दुसऱ्यांदा त्याला इतक्या जोराचा शॉक लागतो की तो पेनच खाली टाकून देतो. धवल कुलकर्णीचा हा प्रॅक झालेला पाहून रोहित टाळ्या वाजवून हसत सुटतो.या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 9:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : रोहित शर्माचा PRANK करायला गेला, पुढे भलतंच घडलं, धवल कुलकर्णीचा झाला गेम


