Rohit Sharma Video : हात जोडले, चाहत्यांना रोखलं...'हिटमॅन'ची 'मुंबईच्या राजा'च्या दरबारात मन जिंकणारी कृती
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चाहत्यांनी मंडपात मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी द्यायला सूरूवात केली होती. पण रोहित शर्माने चाहत्यांना रोखत मन जिंकलं आहे.या सदंर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma take Blessing Mumbaicha Raja Ganpati : टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा सध्या मुंबईतील गणपतींचे दर्शन घेत आहे.कालच त्याने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते.त्यानंतर आज त्याने मुंबईचा राजाचा आर्शिवाद घेतला.या दरम्यान चाहत्यांनी मंडपात मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी घोषणाबाजी द्यायला सूरूवात केली होती. पण रोहित शर्माने चाहत्यांना रोखत मन जिंकलं आहे.या सदंर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रोहित शर्मा आज मुंबईच्या राजा या गणपतीचं दर्शन घ्यायला गेला होता. यावेळी दर्शनाला पोहोचताच चाहत्यांनी त्याला बघून घोषणाबाजी करायला सूरूवात केली होती. 'मुंबईचा राजा रोहित शर्मा', 'मुंबईचा राजा रोहित शर्मा'...चाहत्यांच्या या घोषणाबाजी पाहून रोहितने त्यांना तत्काळ रोखलं.रोहितने नुसतं हावभावातून सांगितलं घोषणाबाजी थांबवा. आणि मुंबईचा राजा एकच आहे तो गणपती बाप्पा.अशाप्रकारे त्याने चाहत्यांना रोखत मन जिंकलं आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे.त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
Rohit stopped everyone to chant Mumbai Cha Raja in front of Bappa🥺
He is so down to earth, humble person. 🥹🤌 pic.twitter.com/gPKWyPg8Fy
— Shikha (@Shikha_003) September 5, 2025
रोहित शर्माने 20 किलो वजन घटवलं
बीसीसीआयने आता नवीन ब्रोन्को टेस्ट सूरू केली आहे.या टेस्टसाठी रोहित शर्माने तब्बल 20 किलो वजन कमी केलं आहे. 17 दिवसात रोहित शर्माने व्यायाम आणि डाएट करून 20 किलो वजन घटवलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार रोहित शर्माचा डाएट प्लानही समोर आला आहे.त्याच्या या डाएटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता ते पाहूयात.
advertisement
रोहित शर्माचा डाएट प्लॅन हा त्याच्या फिटनेससाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या डाएटची सुरुवात सकाळी 7 वाजता होते, त्यावेळी तो 6 भिजवलेले बदाम, अंकुरलेले सॅलड आणि ताज्या फळांचा रस पितो. सकाळी 9.30 वाजताच्या नाश्त्यामध्ये फळांसोबत ओटमील आणि एक ग्लास दूध घेतो, ज्यामुळे त्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.
दुपारच्या जेवणाआधी सकाळी 11.30 वाजता तो दही, चिल्ला आणि नारळपाणी घेतो. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते. दुपारी 1.30 वाजताच्या जेवणात ताज्या भाज्या आणि वरण-भात यांचा समावेश असतो, जे संतुलित आहाराचे उत्तम उदाहरण आहे.
advertisement
संध्याकाळी 4.30 वाजता रोहित फ्रूट स्मूदी आणि ड्रायफ्रुट्स खातो, ज्यामुळे त्याला पुन्हा ताजेतवाने वाटते. रात्री 7.30 वाजताच्या जेवणात तो भाज्यांसोबत पनीर,पुलाव आणि भाज्यांचे सूप घेतो, जो एक हलका पण पौष्टिक आहार आहे.रात्री 9.30 वाजता एक ग्लास दूध आणि मिक्स्ड नट्स घेऊन तो आपला दिवसभराचा डाएट पूर्ण करतो. अशाप्रकारे, रोहित शर्माचा डाएट प्लॅन हा त्याच्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेणारा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 8:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma Video : हात जोडले, चाहत्यांना रोखलं...'हिटमॅन'ची 'मुंबईच्या राजा'च्या दरबारात मन जिंकणारी कृती


