IPL 2025 : तू मनापासून नेतृत्व...,लखनऊच्या खराब कामगिरीनंतर गोयंका पंतला स्पष्टच बोलले

Last Updated:

. लखनऊचा या हंगामातला हा शेवटचा सामना होता.पण हा सामना जिंकून त्यांना शेवट गोड करता आला नाही. त्यानंतर आता लखनऊच्या आयपीएल 2025 मधील कामगिरीवर आणि रिषभ पंतच्या नेतृत्वावर संजीव गोयंका यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

sanjeev goenka rishabh pant
sanjeev goenka rishabh pant
IPL 2025 : आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना मंगळवारी संपुष्ठात आला. या सामन्यात आरसीबीने 6 विकेट्स राखून लखनऊ विरूद्धचा सामना जिंकला. लखनऊचा या हंगामातला हा शेवटचा सामना होता.पण हा सामना जिंकून त्यांना शेवट गोड करता आला नाही. त्यानंतर आता लखनऊच्या आयपीएल 2025 मधील कामगिरीवर आणि रिषभ पंतच्या नेतृत्वावर संजीव गोयंका यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजीव गोयंका यांनी एक्सवर एक पोस्ट लिहली आहे.या पोस्टमध्ये लखनऊच्या आयपीएलमधील कामगिरीवर भाष्य केले आहे. लखनऊ सूपर जाएटस हा आयपीएल हंगाम संपत असताना, आम्ही विजय आणि आव्हानांनी भरलेल्या प्रवासाकडे मागे वळून पाहतो. आमच्या संघाची लढाऊ भावना, एकता आणि लवचिकता ही सर्वात वेगळी गोष्ट होती. आम्ही वचनबद्ध राहिलो, एकमेकांना पाठिंबा दिला आणि कधीही हार मानली नाही,असे गोयंका यांनी म्हटले.
advertisement
advertisement
तसेच गोयंका यांनी पुढे रिषभ पंतचे आभार मानले.मनापासून नेतृत्व केल्याबद्दल आणि संघातील प्रत्येक खेळाडूला त्यांचे सर्वस्व दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच जहीर खान, जस्टिन लँगर, विजय दहिया आणि संपूर्ण व्यवस्थापन आणि सहाय्यक कर्मचारी - प्रशिक्षक, फिजिओ, विश्लेषक आणि ग्राउंड स्टाफ - यांचे पडद्यामागे अथक प्रयत्न केल्याबद्दल आभारी आहे.
आमच्या चाहत्यांचे, तुमच्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि आमच्यासोबत या प्रवासाचा भाग असल्याबद्दल आभारी आहे. प्रोत्साहन आणि प्रेरणा दिल्याबद्दल सोमजीत सिंह आणि भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाचे विशेष कौतुक. आणि पुढील हंगामात. आम्ही अधिक मजबूत होऊन परत येऊ, असा विश्वास गोयंका यांनी व्यक्त केला.
advertisement
पंतच्या शतक खेळीवर गोयंका काय म्हणाले होते? 
रिषभ पंतच्या खेळीवर आता संजीव गोयंका यांनी प्रतिक्रिया दिली आहे.संजीव गोयंका यांनी पंतच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये संजीव गोयंका यांनी 'Pant'astic पंतास्टिक असे लिहले आहे.अशाप्रकारे संजीव गोयंका यांनी रिषभ पंतचं कौतुक केले आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : तू मनापासून नेतृत्व...,लखनऊच्या खराब कामगिरीनंतर गोयंका पंतला स्पष्टच बोलले
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement