Sara Tendulkar : 'आजीसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं...', सारा तेंडुलकर अस्खलित मराठी बोलली, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचा अस्खलित मराठी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचा अस्खलित मराठी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा तिने आजीसाठी पाहिलेलं स्वप्न कसं पूर्ण केलं, हे व्हिडिओमध्ये सांगत आहे. एका जाहीर कार्यक्रमामध्ये सारा मराठीमध्ये बोलत होती.
'मला तुम्हाला मराठीमध्ये काहीतरी सांगायचं आहे. मी खूप लहान होते, तेव्हापासून आजपर्यंत माझी आजी नेहमी मला सोन्याचं काहीतरी द्यायची. कानातले किंवा गळ्यातली चेन, माझं एकच स्वप्न होतं की मी एक दिवस मोठी झाल्यावर तिच्यासाठी माझ्या स्वत:च्या पैशातून काहीतरी सोन्याचं द्यायचं. आता माझं हे स्वप्न पूर्ण झालं आहे', असं सारा म्हणाली आहे.
advertisement
advertisement
साराने सुरू केला व्यवसाय
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने मागच्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात नवीन व्यवसाय सुरू केला आहे. मुंबईमधल्या अंधेरीमध्ये सारा तेंडुलकरने तिची अकॅडमी सुरू केली आहे. साराने पिलाटेस अकॅडमीची फ्रॅन्चायजी घेतली आहे. आतापर्यंत सारा तिच्या स्वत:च्या फिटेनेसकडे लक्ष द्यायची, पण आता ती लोकांनाही फिटनेसचे धडे देत आहे.
advertisement
सारा तेंडुलकरच्या पिलाटेस अकॅडमीचं उद्घाटन सचिन तेंडुलकरने नारळ फोडून केलं. हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेश पूजनाने होते, त्याच पद्धतीने सचिनने साराच्या अकॅडमीच्या उद्घाटनावेळी गणेश पूजा केली. या कार्यक्रमाला सारा तेंडुलकरसोबत कुटुंब आणि तिच्या मैत्रिणीही उपस्थित होत्या.
काय आले पिलाटेस अकॅडमी?
पिलाटेस अकॅडमीचं उद्दीष्ट लोकांना फिजिकल हेल्थबद्दल मार्गदर्शन करण्याचं आहे. यामध्ये एक्सरसाईज, शरिराची लवचिकता, आहार आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं जातं. सारा तेंडुलकर तिच्या फिटनेसबद्दल किती सतर्क आहे, हे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटकडे पाहिलं तरी दिसतं. अनेकवेळा सारा जिममधल्या तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sara Tendulkar : 'आजीसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं...', सारा तेंडुलकर अस्खलित मराठी बोलली, Video











