Shikhar Dhawan Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का, गब्बरने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Shikhar Dhawan Retirement: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर म्हणून गब्बरकडे अर्थात शिखर धवनकडे पाहिलं जातं, त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानं चाहते चिंतेत आहेत.
मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या शिखर धवननं धक्कादायक निर्णय घेतला आहे. शिखर धवननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळून म्हणून धवनची विशेष ओळख आहे.
धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं. शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन हा मेसेज चाहत्यांपर्यंत दिला आहे.
''मी माझ्या क्रिकेटचा हा अध्याय इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्यासोबत अनेक आठवणी सोबत घेऊन जात आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि मी घेतलेल्या निर्णयावर मला पाठिंबा दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.''
advertisement
धवनने भारतासाठी 167 वनडे सामने, 68 टी-20 आणि 34 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 7 शतकांसह 2315 धावा आहेत तर वनडे सामन्यात त्याने 17 शतकांच्या मदतीने 6782 धावा केल्याची नोंद आहे. T20 मध्ये धवनने 11 अर्धशतकांसह 1759 धावा केल्या आहेत. धवनने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2024 8:27 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का, गब्बरने तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती