Shikhar Dhawan : ऑस्ट्रेलियात गर्लफ्रेंडसोबत रेड हँड पकडला गेला होता शिखर धवन, 'द वन' आत्मचरित्रात गब्बरचा धक्कादायक खुलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shikhar Dhawan Autobiography The One : मला आणखी दोन वर्ष इंटरनॅशनल स्टेजवर खेळता आलं असतं. पण आता मला पश्चाताप नाहीये. तरुण पोरांनी यातून धडा घेतला पाहिजे, असं शिखर धवन म्हणाला आहे.
Shikhar Dhawan Girlfriend consequences : टीम इंडियाला माजी स्टार सलामवीर लेफ्ट हँडर खेळाडू शिखर धवन याने त्याचं आत्मचरित्र "द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर" प्रकाशित केलं आहे. टीम इंडियाचा गब्बर म्हटल्या जाणाऱ्या शिखर धवनने आपल्या आयुष्यातील उतार चढावावर भाष्य केलं. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक प्रसंग सांगितला आणि तरुण खेळाडूंना सावध केलं.
ऑस्ट्रेलियामध्ये मी पकडलो गेलो...
ऑस्ट्रेलियामध्ये एक घटना घडली होती. एअरपोर्टवर एका मुलीला मी भेटलो होतो, तिच्यासोबत बोलणं चालणं झालं. आमची मैत्री झाली. तिच्यासोबत मी टुरच्या वेळी फिरत देखील होतो. त्यावेळी मी खूप तरुण होतो, अशा वयात अशा घटना होत असतात. तिच्यासोबत फिरत असताना मी पकडलो गेलो होतो. सिलेक्टरला मी दिसलो, असं शिखर धवनने आत्मचरित्रात खुलासा केला.
advertisement
आता मला पश्चाताप नाहीये...
या घटनेचा माझ्या करिअरवर देखील मोठा परिणाम झाला. आता नक्कीच मला याचा पश्चाताप होत नाही. पण त्या घटनेमुळे मी दोन वर्ष मागे पडलो. मला आणखी दोन वर्ष इंटरनॅशनल स्टेजवर खेळता आलं असतं. पण आता मला पश्चाताप नाहीये. तरुण पोरांनी यातून धडा घेतला पाहिजे, असं शिखर धवन म्हणाला आहे.
advertisement
द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर
धवनच्या आत्मचरित्र "द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर" मध्येही या घटनेचा उल्लेख आहे. पुस्तकानुसार, धवनने लिहिलं आहे की, "एके संध्याकाळी, मी माझ्या ब्रिटीश मैत्रिणी एलेनसोबत जेवायला बाहेर असताना, ही बातमी संपूर्ण संघात वाऱ्यासारखी पसरली. आमच्यासोबत दौऱ्यावर असलेल्या एका वरिष्ठ राष्ट्रीय निवडकर्त्याने आम्हाला लॉबीमध्ये पाहिले आणि मी माझ्या मैत्रिणीचा हात धरला होता. मला सोडून द्यावे असे वाटले नाही कारण तो गुन्हा नव्हता.
advertisement
मिशा फिरवण्याची शैली कुठून शिकली?
दरम्यान, पुस्तकात लिहिल्यानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात माझी कामगिरी सातत्याने घसरत गेली आणि जर मी चांगली कामगिरी केली असती तर मला भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळालं असतं. पण मला एक-दोन वर्षे मागे टाकण्यात आलं, असं धवनने पुस्तकात लिहिलं आहे. पुस्तकात शिखरने मिशा फिरवण्याची शैली ट्रक ड्रायव्हर्सकडून शिकली, याची कबुली दिली. नंतर, शिखरची मिशा आणि दाढीची शैली क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत पसरली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 11:24 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan : ऑस्ट्रेलियात गर्लफ्रेंडसोबत रेड हँड पकडला गेला होता शिखर धवन, 'द वन' आत्मचरित्रात गब्बरचा धक्कादायक खुलासा!









