VIDEO : ''भारताविरूद्धच्या सामन्यात आम्ही दोघांनी लपून इंजेक्शन घेतलं'', पाकिस्तानच्या दिग्गजाचा गौप्यस्फोट, क्रिकेटविश्व हादरलं!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारता विरूद्धच्या सामन्यात दोघे स्टेरॉईड घेऊन खेळल्याचा मोठा गौप्यस्फोट पाकिस्तानचा दिग्गज खेळाडूने केला आहे. विशेष म्हणजे त्याने हा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या नेशनल टेलिव्हीजनवर केला आहे.
India vs Pakistan : टी20 वर्ल्डकपमध्ये आज सुपर 8 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास पल्लीकेलेच्या मैदानावर सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी क्रिकेटविश्व हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. कारण भारता विरूद्धच्या सामन्यात आम्ही दोघांनी लपून गोळ्या आणि इंजेक्शन (स्टेरॉईड) घेऊन खेळल्याचा मोठा गौप्यस्फोट पाकिस्तानचा दिग्गज खेळाडूने केला आहे. विशेष म्हणजे त्याने हा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या नेशनल टेलिव्हीजनवर केला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टॅपमॅड शो दरम्यान कबूल केले की खेळाडूंवर डोपिंगद्वारे दुखापती लपवण्यासाठी तीव्र दबाव होता. खेळाडू वरिष्ठ क्रिकेटपटू तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) सदस्यांना मूर्ख बनवत होते. मनोरंजक म्हणजे सकलेन शोएबच्या शेजारी बसला होता आणि त्याने डोपिंगच्या दाव्यांना आक्षेप घेतला नाही .
🚨BIG ADMISSION OF DOPING BY SHOAIB AKHTAR ON LIVE TV
"Saqlain and I had a bet on who would get Sachin’s wicket during Pakistan's 1998–99 India tour. Both our knees had given up on us. We were secretly taking banned pills and injections just to keep ourselves going." pic.twitter.com/qVo5I6Vk0Y
— Brutal Truth (@sarkarstix) February 24, 2026
advertisement
1998-99 च्या पाकिस्तानच्या भारत दौऱ्यात सचिनची विकेट कोण घेईल यावर सकलेन आणि मी पैज लावली होती? असे शोएब अख्तर म्हणाला. त्यानंतर आमचे दोन्ही गुडघे आमच्यावर हार मानत होते. आम्ही स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी गुप्तपणे बंदी असलेल्या गोळ्या आणि इंजेक्शन (स्टेरॉईड) घेत होतो,असा खळबळजनक गौप्यस्फोट शोएब अख्तरने केला आहे.
धक्कादायक म्हणजे, मोहम्मद आसिफ आणि शोएब अख्तर यांना नॅन्ड्रोलोन (19-नॉर्टेस्टोस्टेरॉन, एक बंदी घातलेला अॅनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टिरॉइड) साठी पॉझिटिव्ह चाचणी आली. डोपिंगमध्ये पकडल्यानंतर पीसीबीने दोन्ही पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांना 2006 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेतली होती.
advertisement
खरं तर क्रिकेट वर्तुळात अशाप्रकारे गोळ्या आणि इंजेक्शन (स्टेरॉईड) घेऊन खेळण्यावर पूर्णपणे बंदी आहे. असे असताना देखील पाकिस्तानी खेळाडू मैदानात टीकून राहण्यासाठी गोळ्या आणि इंजेक्शन घेऊन मैदानात खेळायचे. ही कबुली स्वत:हून शोएब अख्तरने लाई्व्ह टीव्हीवर दिली आहे. विशेष म्हणजे 1999 पासून आता 2026 पर्यंत जवळपास 27 वर्ष पाकिस्तानने अशाप्रकारे पुन्हा इंजेक्शन घेऊन मैदानात खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आयसीसी पाकिस्तानी खेळाडूंची मेडीकल चाचणी करणार? आणि शोएब अख्तरच्या त्या व्हिडिओवरून आता आयसीसी काय कारवाई करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 5:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : ''भारताविरूद्धच्या सामन्यात आम्ही दोघांनी लपून इंजेक्शन घेतलं'', पाकिस्तानच्या दिग्गजाचा गौप्यस्फोट, क्रिकेटविश्व हादरलं!







