'कॅप्टन' Shreyas Iyer वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर! 6 महिने कसोटी क्रिकेट का खेळणार नाही? BCCI ची मोठी घोषणा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer Ruled Out Of West Indies : श्रेयस अय्यरने रेड-बॉल क्रिकेटमधून (कसोटी क्रिकेटमधून) सहा महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय बीसीसीआयला कळवला आहे.
Shreyas Iyer Captain For odi Series against Australia : आशिया कपनंतर लगेचच टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाची घोषणा लवकर होणार आहे. अशातच आता श्रेयस अय्यर याने मोठा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यर याने कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असताना त्याच्या गळ्यात वनडे संघाच्या कॅप्टन्सीची माळ घालण्यात आली आहे. श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंडिय़ा ए संघाचा कॅप्टन बनवण्यात आलंय.
श्रेयस अय्यरचा सहा महिन्यांचा ब्रेक
श्रेयस अय्यरने रेड-बॉल क्रिकेटमधून (कसोटी क्रिकेटमधून) सहा महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय बीसीसीआयला कळवला आहे. यूकेमध्ये पाठीची शस्त्रक्रिया करून तो बरा झाला होता, परंतु अलिकडेच त्याला दीर्घ स्वरूपातील क्रिकेट खेळताना वारंवार पाठीत दुखणे आणि कडकपणा जाणवत आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
इराणी कपमध्ये श्रेयसला नो एन्ट्री
advertisement
श्रेयस अय्यर सहा महिन्यांच्या कालावधीचा वापर सहनशक्ती, शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्तीवर काम करण्यासाठी करू इच्छितो, श्रेयसच्या या निर्णयामुळे, इराणी कपसाठी त्याच्या निवडीचा विचार करण्यात आला नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. याचाच अर्थ श्रेयसला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत घेण्याचा विचार नव्हता का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
advertisement
NEWS
India A and Rest of India squads announced.
Details https://t.co/dxKoR98VzX
— BCCI (@BCCI) September 25, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी टीम इंडिया ए - श्रेयस अय्यर (C), प्रभसिमरन सिंग (WK), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (WK), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंग.
advertisement
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित वनडेसाठी टीम इंडिया ए - श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा (VC), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (WK), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विप्रराज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'कॅप्टन' Shreyas Iyer वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर! 6 महिने कसोटी क्रिकेट का खेळणार नाही? BCCI ची मोठी घोषणा