Saina Nehwal Divorce : ऑलिम्पिक स्टार सायना नेहवालचा घटस्फोट, 7 वर्षांचा संसार मोडला, फुलराणी म्हणाली 'कधीकधी आपल्याला...'

Last Updated:

Saina Nehwal Parupalli Kashyap Divorce : भारताची ऑलिम्पिक स्टार सानिया नेहवालने रात्री सुमारे 11.30 वाजता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि खळबळ उडवून दिली

Saina Nehwal Divorce
Saina Nehwal Divorce
Saina Nehwal Divorce News : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिडा श्रेत्रात घटस्फोटाची मालिका सुरूच आहे. मागील काही वर्षात हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांसारखे स्टार खेळाडू आधीच त्यांच्या जोडीदारांपासून वेगळे झाले आहेत. आता बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या 'ब्रेक अप' पोस्टने (Saina Nehwal) सर्वांना धक्का दिला आहे. सायनाने तिचा पती आणि बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यपसोबतचे (Saina Nehwal husband) सात वर्षांचं वैवाहिक नातं संपवलं आहे.

सात वर्षांचा संसार मोडला

ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालने (Saina Nehwal) तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का दिला आहे. सानियाने रात्री सुमारे 11.30 वाजता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि खळबळ उडवून दिली. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2012 मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण हे नाते फक्त सात वर्षेच टिकले. 35 वर्षांच्या सायनाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून पतीसोबत वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला.
advertisement

इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट

सायनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, "जीवन कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे आमच्यासाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती आणि समाधान निवडत आहोत."
advertisement

घटस्फोटाचं कारण काय?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दोघांच्या वेगळे होण्याबद्दल कोणतीही चर्चा किंवा अफवा नव्हत्या. त्यामुळे यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सायनाने पुढे लिहिले, "मी या आठवणींसाठी नेहमीच आभारी राहीन आणि पुढे जाताना फक्त चांगल्याचीच अपेक्षा करते. अशा वेळी आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि ती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद."
advertisement

सायनाचे ऑलिम्पिकमधील यश आणि कश्यपचे कॉमनवेल्थमधील सुवर्णपदक

सायना नेहवालने (Saina Nehwal) 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उज्वल केले होते. त्यानंतर 2015 मध्ये सायनाने वर्ल्ड बॅडमिंटन क्रमवारीत पहिले स्थान पटकावून इतिहास रचला आणि जगातील नंबर वन शटलर बनणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. दुसरीकडे, पी. कश्यपने (P. Kashyap) 2014 च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. अशातच आता दोन्ही खेळाडूंनी आपल्या करियरला प्राधान्य देत घटस्फोट घेतला आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Saina Nehwal Divorce : ऑलिम्पिक स्टार सायना नेहवालचा घटस्फोट, 7 वर्षांचा संसार मोडला, फुलराणी म्हणाली 'कधीकधी आपल्याला...'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement